काजळी देऊरवादा या दोन्ही गावात गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री,नवीन विक्रेते यांच्या मध्ये कमालीची वाढ

Google search engine
Google search engine

चांदुर बाजारआणि शिरजगाव कसबा पोलिसांनि लक्ष देण्याची गावकरी यांची मागणी

चांदुर बाजार:-
चांदुर बाजार तालुक्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काजळी आणि शिरजगाव कसबा या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देऊरवादा हे गाव आहे.या दोन्ही गावामध्ये गावठी दारूचा व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या ठिकाणी गावठी दारूचा व्यवसाय मुळे गावात अशांतता चे वातावरण तयार झाले आहे.

चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काजळी गावातील ग्रा.प.कार्यलाय यांनी  वारंवार थोडी आणि लिखित स्वरूपात पोलीस स्टेशनमध्ये मध्ये तक्रार केली मात्र त्या सर्वांचा काही फरक या गावठी दारू विक्री करणाऱ्या व्यवसाहिक यांच्या झाला नसल्याचे दिसून येत आहे.तर पोलीस कार्यवाही करण्या अगोदरच त्यांना आज कार्यवाही होणार याची माहिती मिळत असल्याने अनेक वेळा पोलिसांना अपयश आले.तसेच गावठी दारू मोठ्या शितापईने या व्यवसाहिक यांच्या कडून लपवली जाते.

देऊरवादा हे गाव शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येते यांच्या गावठी दारू विक्रेता यांच्यावर ठाणेदार कवाडे यांनी वारंवार कार्यवाही केली तरी मात्र त्याचा व्यवसाय हा कमी होण्या पेक्षा जास्त वाढतच जात आहे.त्यामुळे या अभय कोणाचे मिळत आहे हा प्रश्न आहे.तर या दोन्ही गावाला गावठी दारूचा पुरवठा मध्यप्रदेश मधील घोमाई या गावामधून होतो आहे.तर गुरुवार सकाळी किंवा सायंकाळी या ठिकाणी गावठी दारू ही पुरविली जाते.शुक्रवारी देऊरवादा या गावचा आठवडी बाजार असल्याने गावठी दारू विक्रेता यांचा व्यवसाय तर चागला होतो,मात्र त्यांच्या या व्यवसाय मुळे अनेकांचे आयुष्य हे बदलून जातात.त्यामुळे दोन्ही गावात अशांतता निर्माण झाली आहे.या कडे पोलीस प्रसासन यांनी लक्ष देण्याची मागणी काजळी आणि देऊरवादा येथील नागरिक करीत आहे.