अकोला आकाशवाणीचे विशेष प्रसारण “चला वृक्ष साक्षर होऊ या “

0
1101
Google search engine
Google search engine

अकोला/संतोष विणके -१ ते ७ जुलै हा वनमहोत्सव सप्ताह म्हणुन सर्वत्र साजरा केल्या जातो.वृक्ष लागवडीचा हा चांगला कालावधी असतो पण कोनता वृक्ष कोठे लावावा ? हेही तितकेच महत्वपूर्ण असते या सर्व बाबी लक्षात घेऊन आकाशवाणी अकोला सादर करणार आहे विशेष कार्यक्रम ‘.चला वृक्ष साक्षर होऊ या ” प्रसारण अधीकारी सुरज गोळे यांचे सादरीकरण असलेला हा विशेष कार्यक्रम -गुरूवार दि.05 जूलै 2018 रोजी. रात्री 08.15 वा.महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरुन एकाच वेळी प्रसारीत होणार आहे. नजिकच्या कोनत्याही आकाशवाणी केंद्रावरून श्रोत्यांना हा कार्यक्रम ऐकता येईल. तसचं आकाशवाणी अकोला केंद्रावरून ( FM 102.4MHz) वर सुध्दा कार्यक्रम ऐकता येणार आहे,या कार्यक्रमाचे
निवेदन-सिमा शेटे.
लेखन-प्रा.डॉ.सहदेव पांडुरंग राेठे.
तांत्रिक सहाय्य-रविकुमार मिना.तसच
सहभाग
विजय माने विभागीय अधिकारी सामाजिक वनिकरण विभाग अकोला.
डॉ.वर्षा टापरे प्रमुख नागार्जुन वनौषधी उद्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ..
पर्यावरण कार्यकर्ता निसर्ग कट्टाचे अमोल सावंत.अन
सादरकर्ते- सुरज गोळे असणार आहेत अकोला आकाशवाणी ने नुकतेच आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले आहे.रसिक श्रोत्यांना दर्जेदार माहीती मनोरंजनाची मेजवानी देणाऱ्या अकोला आकाशवाणी ने एफ .एम.च्या दुनीयेत आजही आपला दबदबा कायम ठेवला आहे.