मसाज सेंटरवर छापा – नागालँड राज्यातील एक व महाराष्ट्रातील दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका

0
1358
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे

खराडी पुणे येथील  स्पा मसाज सेंटर  “केडिया स्पा हेवन” एरिया एव्हेन्यू येथील पहिल्या मजल्यावर मसाज च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना मीहिती  मिळाली ,  खात्रीशीर  मिळलेल्या माहितीच्या आधारे पो.नि. संजय पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी  तेथे छापा टाकून सोमनाथ बनवारीलाल केडिया याला ताब्यात घेतले आहे . यावेळी नागालँड राज्यातील एक व महाराष्ट्रातील दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली.

    याबाबत पो.नि.पाटील यांनी  अधिक माहिती दिली कि, त्यांना पोलीस नाईक तुषार आल्हाट यांच्या मार्फत खबर मिळाली कि, खराडी येथील ‘केडिया स्पा हेवन’ या मसाज सेन्टरमध्ये आरोपी सोमनाथ बनवारीलाल केडिया हा मसाज पार्लरमध्ये ठेवलेल्या थेरपिस्ट मुलींकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत आहे.  यावेळी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा , चंदननगर पोलिसांच्या मदतीने त्या ठीकाणी छापा टाकण्यात आला.  यावेळी रोख रक्कम १९,८६० ,१ मोबाईल, इतर कागदपत्रे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पिडीत मुलीनां रेस्कू फौंडेशन, महमदवाडी, हडपसर याठिकाणी  ठेवण्यात आले आहे. सदर आरोपीला भा.द.वि.कलम ३७०, ३७० (अ) , पिटा अॅकट ३,४,५ अन्वये चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदर कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे , पंकज डहाणे पोलीस उपायुक्त गुन्हे, भानुप्रताप बर्गे सापोआ यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनि संजय पाटील,सपोनि  चंद्रकांत जाधव, सपोनि अनिता खेडकर, तुषार आल्हाट, राजाराम घोगरे, प्रमोद म्हेत्रे, नितीन लोंढे, नितीन तेलंगे, प्रदीप शेलार, सचिन शिंदे, ननिता येळे, सुप्रिया शेवाळे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे यांनी व चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक व त्यांच्या कर्माचारी यांनी संयुक्तिक केली आहे.