महिला कॉंग्रेसच्या चांदूर रेल्वे शहराध्यक्षपदी स्वाती मेटे यांची वर्णी – कौतुकांचा होत आहे वर्षाव

0
785
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
कॉंग्रेस कमेटीच्या महिला शहर अध्यक्षपदावर कॉंग्रेसच्या प्रभाग क्र. ७ च्या सक्रीय नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांची निवड करण्यात आली आहे.
  नगरसेविका स्वाती मेटे यांनी आपल्या प्रभागात विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबविले आहे. यासोबतच स्वच्छता जनजागृती मोहीममध्ये त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम सातत्याने, प्रामाणिकपणे सौ. मेटे करीत असुन पक्षाचे काम पक्षाचे ध्येयधोरण तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही जिद्दीने व निष्ठेने केले. याचीच दखल घेऊन
ग्रामिण महिला कॉंग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्षा छाया दंडाळे यांनी चांदूर रेल्वे महिला शहर अध्यक्षपदी सौ. स्वाती मेटे यांची ३ जुलै रोजी निवड केली. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुक्ष्मीता देव यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ममता भूपेश तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम सक्षमपणे करणार असल्याचे स्वाती मेटे यांनी सांगितले.
     त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.