रेणुशेवाडी येथे कृषी दिंडी, वृक्षारोपण,व कृषी चर्चा सत्र उत्साहात संपन्न

548
जाहिरात

कडेगांव/हेमंत व्यास-

भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम कृषी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी,वक्षारोपण व कृषीचर्चा संत्र्याचे आयोजन रेणुशेवाडी तालुका कडेगांव येथे युवा नेते डॉ.जितेश भैय्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व रेणुशेवाडीच्या उपसरपंच सौ.वनिता संजय रेणुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी रेणुशेवाडी गावातुन वृक्ष दिंडी काढण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी डी.बी.होलमुखे,मंडल कृषी अधिकारी एम.डी.शिंदे,हर्षवर्धन कदम तलाठी सौ.देवयानी कुलकर्णी, ग्रामसेवक अमोल माळी आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी कृषी चर्चा सत्रात सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर बोलताना रोहीत सावंत म्हणाले की, सेंद्रीय शेती म्हणजे सजीव पर्यावरणिय रचना आणि जीवनचक्र समजुन घेऊन व रसायनांचा वापर टाळुन केलेली एकात्मिक शेती पद्धती होय.रासायनिक खतांचा अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला आधुनिक बियाणामुळे पारंपरिक बियाणांच्या जाती नष्ट होऊ लागल्या.शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पन्नात खर्च वाढु लागला म्हणुन शेतकऱ्यांनी स्वत:चा तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रिय शेती पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे व सर्वांच्याच फायद्याचे आहे.सेंद्रिय शेती ही मुलभुत गरजांवर अधारीत आहे.त्यासाठी सेंद्रिय शेती पध्दत प्रत्येक शेतकऱ्याने समजुन घेऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे.शेतकऱ्यामध्ये शेती विषयक ज्ञानाचा अभाव आणि असंघटित पणामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती सेंद्रिय शेतीची.कडेगांव तालुका कृषी अधिकारी डी.बी.होलमुखे यांनी कृषी दिनाचे महत्त्व या विषयावर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी प्रा.आर.एस पवार,एस.एस.माने,एस.टी.माने,डाॅ.सी.डी.औताडे, पशुवैद्यकीय परीवेक्षक सी.आर.मावस्कर,यांच्यासह कृषीदुत उदय देवकुळे,श्रीधर शिंदे,ज्ञानेश्वर कुंभार,सौरभ माने,श्रीधर ऐवळे, विजयसिंह कोळी यांचेसह रेणुशेवाडीचे शेतकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.