एस एस सी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार व वृक्षारोपण समारंभ संपन्न

0
2320
Google search engine
Google search engine

सांगली /कडेगांव/हेमंत व्यास. –

महात्मा गांधी विद्यालयात एस एस सी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,व वृक्षारोपण समारंभ विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम व पलुस कडेगांव मतदार संघाचे आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एस.जी.एम.काॅलेजचे प्राचार्य मोहन राजमाने,रयतचे माजी सचिव खोत साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला एन.ऐ. मॅडम, पर्यवेक्षक वंजारी सर, नगराध्यक्ष सौ.आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष साजिद पाटील ,रयत कार्यकारणी सदस्य दिपक भोसले,विजय शिंदे,प्रकाश
जाधव,नगरसेवक दिनकर जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एस.जी.एम काॅलेजचे प्राचार्य मोहन राजमाने भाषणात म्हणाले की,या विद्यालयातील २२६ विद्यार्थी,एस एस सी परिक्षेसाठी बसले होते.त्या पैकी २२५ विद्यार्थी पास झाले त्यातील ३७ विद्यार्थी हे ९०टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेले आहेत.हे यश या विद्यालयातील सर्व शिक्षकांचे आहे त्यांनी गुरूकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे पुढे भाषणात बोलताना प्राचार्य राजमाने म्हणाले की,माझे व डॉ.पतंगराव कदम साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.ते मला म्हणायचे की कडेगांवच्या महात्मा गांधी विद्यालयाला एस.जी.एम.काॅलेजच्या वतीने ५लाखाची मदत कर आज ते आपल्यात ते नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव आमदार डॉ.विश्वजित कदम आहेत.त्याचे हस्ते साहेबांनी मला सांगीतलेला ५ लाखांचा धनादेश मी महात्मा गांधीं विद्यालयास देत आहे.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पलुस कडेगांव मतदार संघाचे आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले की,शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे.हे ओळखुन समाजाच्या उद्धारासाठी रयत शिक्षण संस्थेने ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची गंगा उभारली आहे.जिथ जिथं रयत शिक्षण संस्थेच्या शाळा,काॅलेज, महाविद्यालये आहेत त्या त्या भागात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे.आमदार डाॅ.विश्वजित कदम म्हणाले की रयत शिक्षण संस्थेवर डॉ.पतंगराव कदम यांचे निस्सिम प्रेम होते.त्यांचे या महात्मा गांधी विद्यालयाकडे ही त्यांचे विशेष लक्ष होते.त्याच प्रमाणे रयत शिक्षण संस्थेने दक्षिण विभागातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निवासी गुरूकुल प्रकल्प, अनिवासी गुरूकुल प्रकल्प,दुरस्थ गुरूकुल प्रकल्प,मिनी गुरूकुल प्रकल्प व सेमी इंग्रजी यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची शैक्षणिक गुणवत्तेत अप्रतिम बदल झाला आहे. या विद्यालयातील गुणवंत,गरीब,होतकरू विद्यार्थी विद्यार्थीनींना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाईल असेही आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले.यावेळी विद्यालयाच्या कुलकर्णी.प्रणिती मोहीते,९८.८०टक्के व प्रज्ञा देशपांडे ९८.४०टक्के या विद्यार्थीनींचा सत्कार डॉ.विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी एस.जी.एम.काॅलेजचे प्राचार्य मोहन राजमाने, माधवराव मोहीते,रयतचे माजी सचिव खोत साहेब, पर्यवेक्षक वंजारी,रयत कार्यकारणी सदस्य विजय शिंदे, दिपक भोसले,नगराध्यक्ष सौ.आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष, साजिद पाटील,नगरसेवक नितिन शिंदे,दिनकर जाधव, सुनिल पवार,डी.एस.देशमुख,प्रकाश गायकवाड,संतोष डांगे, बाबासाहेब शेख,अशोक शिंदे, बावस्कर सर,पालक,शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार वंजारी सर यांनी मानले तर सुत्रसंचलन आकाश सरगर यांनी केले.