प्रल्हादपूर येथे बसली विकासाला खीळ

Google search engine
Google search engine

प्रल्हादपूर मधील अंतर्गत रस्ताही दयनीय अवस्था,प्रशासन याना येणार तरी का जाग.

प्रल्हादपूर शशिकांत निचत.

चांदुर बाजार तालुक्यातील अगदी शहराला लागून असणारी सर्वात मोठी व जास्त महसूल गोळा करणारी शी. बंड ग्राम त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये जाणार आणि जास्त प्रमाणात वर्दळीचा रस्ता लता गॅस एजन्सी,महात्मा फुले कॉलनी, संगोकर नगर ते थेट अमरावती,तिवसा या मुख्य रस्त्याला जोडणार प्रल्हादपूर मधील अंतर्गत रस्त्याची दैयनिय अवस्था आहे.
हा रस्ता प्रल्हादपूर मधील 5 ते 6 कॉलनी मिळून प्रमुख रस्ता पूर्णतः उघडल्याने त्यावरील वाहतुकीला आणि शालेय विद्यार्थी वर्ग ,स्कुल वाहन,मोटरसायकल याना चांगल्या प्रकारे समस्या याना समोर जावे लागत आहे.त्यामुळे विध्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक यांच्या अपघात शक्यता या रस्त्यामुळे वर्तवली जात आहे.हा रस्ता तातडीने दुरुस्त करणयात यावी अशी मागील येथील रहिवासी यांची होत आहे.
स्थानिक शिरजगाव बंड च्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.त्या ठिकाणी रस्त्याला मोठं मोठे खडे शुद्ध पडले आहे.या रस्त्यावरून पायी चालणे शुद्ध अशक्य झाले असल्याने नागरिक याना चागला च त्रास होत असल्याचे चित्र दिसत आहे तर या कडे प्रशासन दाखल कधी घेणार हे महत्वाचे.

लोकप्रति तथा प्रशासन यांची दखल घेऊन दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.10 ते 12वर्षा पासून या रस्त्याचे दुरुस्ती चे काम करण्यात आले नाही.त्या कडे शी बंड चे ग्रामविकास अधिकारी व इतर प्रशासन तथा कधीच लक्ष दिले नाही.म्हणून हा रस्ता कमालीचा उघडला आहे.