अकोटशहर पोलिसांनी पुढाकार घेत बुजवला सोनु चौकातील तो जीवघेणा खड्डा

0
960
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके -शहरातील सोनू चौक हा कायम वर्दळीचा चौक आहे या चौकात मधोमध असणारा जिवघेणा खड्डा माञ अनेक अपघातास निमंञण देणारा ठरत होता.हा खड्डा अखेर शहर पोलीसांनी पुढाकार घेत बुजवला. अकोट शहरातील अंतर्गत भागांत जाण्यासाठी नागरिकांना ह्याच चौकातून जावे लागते तसेच अकोट शहरातील मुख्य बाजार पेठ ह्याच चौकातील मार्गावर असल्याने तसेच अंजनगाव मार्गावर जाण्यासाठी सुद्धा छोटे वाहन धारक हाच मार्ग वापरत असल्या मुळे हा चौक नेहमी गजबजलेला असतो, ह्या मार्गाच्या वळण मार्गाचे अतिक्रमण काही दिवसा पूर्वी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पुढाकार घेऊन दूर केल्याने सोनू चौक प्रशस्त झाला होता व सोनू चौकाने मोकळा श्वास घेतला होता तसेच सोनू चौकाच्या मध्य भागी असलेल्या नालीवरील ग्रील दुरुस्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते, परंतु काही दिवसांपासून ह्या नालीच्या ग्रील भोवती भला मोठ्ठा खड्डा पडल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करीत वाहने घेऊन जावी लागत होते, नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन भविष्यातील अपघात टाळण्या साठी अकोट शहराचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कदिरभाई ठेकेदार व फारुखभाई अकबनी ह्यांचे मदतीने स्वतः उभे राहून सदर जीवघेणा गड्डा काँक्रीट टाकून कायमचा बुजवून भविष्यातील वाहन अपघात टाळला ह्या साठी अकोट शहर पोलिसांचे अकोट शहरवाशी कौतुक करीत आहेत