रिद्धपुर या ठिकाणी होणार मराठी भाषा विद्यापीठ

0
1792
Google search engine
Google search engine

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ तयार होणार हालचाली याना आला वेग
शासकीय समिती श्री क्षेत्र रिद्धपुर या ठिकाणी दाखल

चांदुर बाजार:-विशेष प्रतिनिधी

मोर्शी तालुक्यातील महानुभाव पंथ आणि काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ व्हावे या साठी मागील 2-3वर्षा पासून या ठिकाणी महानुभाव पंथ मधील महंत त्याचा पाठपुरावा देखील करत आहे.त्यांच्या ८ऑक्टोबर २०१० ला राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुबंई या ठिकाणी या बाबत निवेदन देण्यात आले होते.त्यावरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सचिव यांनी २८ ऑक्टोबर २०१० ला या बाबत समिती गठीत करण्याचे सांगितले होते.

आज दिनांक ७जुलै 2018 ला शासकीय समिती श्रीक्षेत्र रिध्दपूर येथे पाहानी करण्या साठी आली होती.यावेळी श्री डाॅ गुप्ता साहेब डाॅ तायडे साहेब डाॅ चव्हाण साहेब ही तीन सदस्य समिती मराठी भाषा विघापिठा साठी पाहणी करून गेली.याबाबत चा अहवाल दि १०\७\२०१८रोजी मंत्रालयात सादर करण्यात येनार आहे. या वेळी पू. श्री.मोहनराज दादा अमृते, पू. म. श्री. वायंदेशकर बाबा, पू. म. श्री. तळेगावकर बाबा ,पू. म.श्री. भगतराज बाबाजी, पू. म. श्री. जायराज बाबा ,पू. ई.श्री.पुरुषोत्तम दादा कारंजेकर(नागपूरे साहेब) मं. श्री. प्रज्ञांसागर बाबा आणि अनेक संत महंत उपस्थिती होते
या वेळी गोपीराज ग्रंथ संग्रालयाचीही पाहानी केली.