चांदुर बाजार येथे गौण खनिज आणि रेती तस्कर यांची वाढती दहशत

0
1081

 ,पोलिसांच्या धडक कार्यवाही तर महसुल प्रशासन यांचे दुर्लक्ष, ग्रामीण भागातील रस्ते जात आहे उघडले.

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार ला मोठ्या प्रमाणावर नदीचे पात्र लाभले आहे.म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेती चे साठे तयार झाले आहे.रेती म्हटले की प्रामाणिक कायदेशीर बाबी ची पूर्तता करून वाहतूक करणारे तर आहे. याचं बरोबर अधिक जास्त फायदा मिळावा या साठी चोरट्या मार्गानी दिवस रात्र न पाहता ,छुप्या मार्गानी रेती ची वाहतूक होत आहे. यातच शासकीय आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर रेती तस्कर याच्यावर हल्ला होण्याच्या घटना आता चांदुर बाजार तालुक्यात सुरू झाल्या आहे.त्यामुळे आता यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन काय पाऊल उचलतील हे पाहावे लागतील.तर या अवैध पणे होत असलेल्या रेती तस्कर याना महसूल विभागा तर्फे खो तर दिला नाही ?अशी चर्चा आहे.तहसील कार्यलाय आवारात अवैध ट्रकर जप्त करण्यात आले.मात्र त्या पेक्षा अधिक ट्रकर हे अवैध पणे रेती च्या कामात आहे.या सर्वांवर महसूल काय कार्यवाही करणार की जो पर्यंत एखाद्या रेती तस्कर याच्या हल्ल्यात मोठी दुर्घटना घडणार नाही तो पर्यंत त्यांना जाग येणार नाही हे अजून अस्पष्ट आहे.

तिकडे आपल्या कायदेशीर पणाची वा – वा करणारे गौण खनिज दार हे सुद्धा आपला मनमानी पणा करीत असल्याचे दिसत आहे.जवळ पास ज्या ठिकाणावरून मुरूम वाहतूक ची परवानगी दिली जाते त्या ठिकानावरुन 5 ते 6 दिवसात ठराविक किंवा दिलेल्या आदेश्या पलीकडे मुरूम ची वाहतूक होते आहे.त्यामुळे काही ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेले रोड याच्या वाहतूक मुळे मातीमोल होणार हे नक्की.तसेच आदेशाच्या पलीकडे झालेल्या मुरूम वाहतूक चा हिशोब कोणाला दिला जातो,यावर महसूल विभागाचे लक्ष आहे की त्याच्याकडून च याकडे दुर्लक्ष केले जाते.?अशा प्रश आहे.तर या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या कडून मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे.याच्या संपर्क तहसील कार्यालयात ठराविक लोक संपर्क असल्याचे बोलले जात आहे.
रेती तस्कर याच्यावर कार्यवाही करणारे पथक आज पर्यत कार्यवाही करताना आढळून आले नाही त्यामुळे ते फक्त नावालाच असल्याचे दिसून येते आहे.

दोन ते तीन दिवसा अगोदर स्थनिक पोलीस स्टेशन मधील कर्मचारी हे अवैध पणे होत असलेल्या रेती वर कार्यवाही करण्यासाठी केले असता त्याच्यावर ट्रकर आणल्याची घटना घडली.मात्र यात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले.अवैध रेती वाहतूक करणारे पाळले मात्र त्यांच्यावर चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.त्यामुळे पोलीस कार्यवाही करत आहे.मग महसूल विभाग का शांत अशी चर्चा जोर धरत आहे