काजळी येथे गावठी दारू जोरदार विक्री,

0
1216
Google search engine
Google search engine

👉🏻काजळी देऊरवाडा या दोन्ही गावातील गावठी दारू विक्री करणाऱ्या कोणाचे अभय?

👉🏻राज्य उत्पादन शुक्ल आणि पोलीस प्रशासण करणार का कार्यवाही?

चांदुर बाजार:-

मध्य प्रदेश मधून थेट महाराष्ट्र ला लागून असलेल्या ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू ची विक्री जोरात सुरू आहे.शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊरवाडा आणि चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काजळी गावामध्ये सुद्धा जोरदार विक्री सुरू आहे.मात्र चांदुर बाजार च्या पोलीस स्टेशन मधील एक कर्मचारी हा काजळी येथील अवैध पणे सुरू असलेल्या गावठी दारू विक्रेते यांच्या संपर्कात असल्याने कधी ,आणि कशी कार्यवाही होणार यांची माहिती काजळी येथील गावठी दारू विक्री करणारे याना माहिती होते.ठाणेदार अजय आकरे यांच्या पासून अजून पर्यत ती माहिती अलिप्त ठेवण्यात आली आहे .त्यामुळे ब्राम्हणवाडा थडी,चांदुर बाजार,त्यांना आसेगाव या ठिकाणी अजय आकरे यांनी गावठी दारू विक्री करणारे यांचा चागला छळा लावला होता.मात्र त्यांच्या हद्दीत येणाऱ्या काजळी या गावातील गावठी दारू वर ते कधी कार्यवाही करतील?हे अद्याप तरी कोडेच आहे.

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊरवाडा या गावातील गावठी दारू वर ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी सतत कार्यवाही करून त्या ठिकाणी अवैध दारू वर जवळपास प्रतिबंध लावला.मात्र देऊरवाडा या ठिकाणी गावठी दारू बंद झाल्यावर फक्त काही अंतरावर असलेल्या काजळी येथील गावठी दारू विक्री करणारे यांचा व्यवसाय ला अधिक प्रतिसाद मिळू लागला आणि गावठी दारू जोरात विक्री होऊ लागली.त्यामुळे या अवैध गावठी दारू विक्री करणारे आणि चांदुर बाजार पोलीस स्टेशन मधील त्या कर्मचारी यावर ठाणेदार अजय आकरे कश्याप्रकरे लगाम लावतील हा प्रशचिन्ह काजळी येथील लोका समोर आहे.