शांतीवन अमृततिर्थ येथील प्रकटदिन महोत्सव भागवतकथेचे आज पासुन टी.व्ही. प्रसारण

0
869

आकोट /संतोष विणके- स्थानिक पोपटखेड मार्गावरील श्री गजानन महाराज संस्थान,शांतीवन अमृततिर्थ आकोली जहाँ.- अकोलखेड़ येथे प्रगटदिन महोत्सव निमित्त अशोकानंद यांच्या वाणीतुन भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचे टी व्ही प्रसारण आजपासुन दाखवण्यात येणार आहे.दररोज दु.3 ते 6 या वेळेत हे प्रसारण दि. 11,12,13 जुलैला दाखवण्यात येणार असुन.सत्संग टी.व्ही.टाटा स्काय चॕनल नं 1073 वर हे प्रसारण पाहता येणार आहे.असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.या प्रसारणामुळं कथेचा लाभ संपुर्ण भारत भरातील संत गजानन महाराजांचे भक्तांना घेता येणार आहे.या निमित्याने शांतीवन अमृत तिर्थावरील श्रीं च्या भक्तीसागराचे अफाट दर्शन देशवासीयांनी होणार आहे.