चांदुर बाजार बसस्थानक मध्ये सुरक्षा ची हमी कोणाची?

चांदुर बाजार आगार मध्ये चोरी च्या प्रकरणात वाढ,चौकशी कक्ष मध्ये दिली जात नाही योग्य माहिती

पोलीस प्रशासन आणि आगार व्यवस्थापक यांनी लक्ष देण्याची गरज

चांदुर बाजार:-

स्थानिक पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चांदुर बाजार येथील बसस्थानक मध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार होत आहे.तसेच बस स्थानक मधील चौकशी कक्ष या ठिकाणी बसेस ची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या प्रवासी याना सुद्धा समाधानकारक उत्तर मिळत नाही.आणि आगार मधील अनेक बसेस या बोर्ड न लावताच उभ्या असतात.त्यामुळे कोणती बस कोठे जात आहे याची माहिती प्रवाशी याना मिळत नसल्याने त्याचा या प्रति रोष व्यक्त होत आहे.

चांदुर बाजार हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी ग्रामीण भागातील सगळ्यात जास्त विध्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी येत असतो. मात्र ठरलेल्या वेळेत बस लागत नसल्याने विध्यार्थी या बराच काळ हा बस स्थानकात घालावा लागतो.चांदुर बाजार आगार मधील अनेक बसेस भंगार अवस्थेत आहे.त्यामुळे अनेक वेळा बस प्रवास सुरु असताना त्या बंद पडल्याचे चित्र आहे.तसेच लग्नसराईत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते.त्यामुळे बसस्थानक परिसरात चोराचा सुद्धा धुमाकूळ सुरू आहे.या ठिकाणी बस स्थानक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावी त्याचप्रमाणे या आगार मधील विद्यार्थी यांच्या आणि प्रवाशी सुरक्षेसाठी कर्मचारी यांची नेमणूक करणयात यावी अशी मागणी होत आहे.
तसेच प्रवाशी आणि महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी सुद्धा आवश्यकता आहे.या सर्व गोष्टीवर लोकप्रतिनिधी हे कधी लक्ष देणार ही बाब सुद्धा तितकीच गंभीर असल्याचे दिसून येते आहे.

या ठिकानी बसेस प्लँटफ्रॉम वर तर लावला जातात मात्र त्या बसेस फक्त रांगेत लावून या ठिकाणच्या समस्या सुटतील असे आगार व्यवस्थापक याना वाटते.मात्र आगार मधील प्रवाशी यांच्या सोबत होणारी चौकशी दरम्यान अरेरावी,बसेस अनिश्चित वेळेत सुटणे,भंगार बसेस,प्रवाशी आणि विध्यार्थी यांची सुरक्षा याकडे ते क कधी लक्ष देणार हे न उमजनारे कोडे आहे.

बॉक्स मध्ये
“या ठिकाणी रोमियो याची संख्या पण अधिक असल्याने विध्यार्थीनि,आणि महिला यांचा सुरक्षा याचा प्रश्न गंभीर आहे.मात्र या कडे आगार व्यवस्थापक का लक्ष देत नाही हा प्रश्न आहे?”

प्रतिक्रिया:-
बसस्थानक या ठिकाणी प्रवाशी याना चागल्या प्रकारची वागनुक दिली जात नाही.तसेच भंगार बसेस,अनिश्चित बस वेळ आणि महिला ,विध्यार्थी यांचा सुरक्षा चा प्रश गंभीर आहे.यावर लवकरात लवकर आगार व्यवस्थकाप यांनी नियोजन करावे.अन्यथा मोठ्या प्रमानात विध्यार्थी वर्ग आणि युवक न सांगता आंदोलन करू या जबाबदार प्रशासन राहतील.


आकाश तिखीले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष चांदुर बाजार

 

जाहिरात