खटकालीच्या जंगलात बांबू व फळझाडांची रोपे लावून पावसाचे स्वागत 

0
1676
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके रासेयो विभाग व वनविभागाचा संयुक्त उपक्रम

उपग्रह व जीपीएस यंत्रणेद्वारे अवलोकन

मेळघाटात पावसाचे जोरदार आगमन झाले असतांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रासेयो विभाग व पश्चिम मेळघाट तथा वनविभागाच्या अकोट वनपरिक्षेत्राच्या वतीने खटकालीच्या जंगलात मंगळवार (ता.१०) ला बांबू व फळझाडांची रोपे लावून पावसाचे स्वागत अभिनव पध्दतिने करण्यात आले.विशेष म्हणजे या वर्षी राज्यशासन पहिल्यांदाच उपग्रह यंत्रणा व ग्लोबल पोझीशनींग सिस्टीम (जीपीएस) च्या माध्यमाने या वृक्षारोपणाचे अवलोकन व मुल्यांकन करणार असल्याने हा वृक्षारोपण कार्यक्रम शास्त्रीय मार्गदर्शनाद्वारे संपन्न झाला.

आयटीआयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (रासेयो) च्या प्रशिक्षणार्थ्यांनी पश्चिम मेळघाट प्रादेशिक वनविभागातील खटकाली वनवर्तूळाच्या वनखंड ९७७ मध्ये बांबू,मोह,आवळा,जांभूळ,सिताफळ,उंबर,चिंच,रिठा आदी झाडांची रोपे जीपीएस अवलोकित खड्ड्यांमध्ये लावली.विशेष म्हणजे ही रोपे खटकालीजवळच्या पोपटखेडमधील वनविभागाच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आली होती.हा वृक्षारोपण प्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश वडोदे,रासेयोचे कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर,वनपाल गजानन उमक,वनपाल दीपक बावनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्या प्रसंगी बोलतांना विनोद नागोलकर यांनी वसुंधरेच्या ओझोन पातळीला पडलेल्या छिद्रामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणविषयक गंभीर समस्येवर वृक्षारोपण,हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले.त्यानंतर वनपाल गजानन उमक यांनी उपग्रह यंत्रणेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाचे अवलोकन व मुल्यांकन होत असल्याने वृक्षारोपणात जीपीएस प्रणालीचा उपयोग कसा होतो,याचे शास्त्रीय मार्गदर्शन रासेयोच्या प्रशिक्षणार्थ्यांना केले.त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी श्री.वडोदे यांनी संपूर्ण वनपरिक्षेत्रात वृक्षलागवडीचे लक्ष्य ६४ हजार असून सद्यस्थितीपर्यंत सव्वासहा हजार वृक्षांची लागवड झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.१३ कोटी वृक्षलागवडीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.हा उपक्रम राबविण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक विनोद डेहणकर व आयटीआय चा प्राचार्य पी.के.खुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आयोजकांनी सांगितले