अकोटात जननी २ मोहीमेच्या शुभारंभ- शाळा महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न

0
1243
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांचे संकल्पनेतून व अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनात आयोजीत होत असणाऱ्या जननी २ या मोहीमेचा पोलिस स्टेशन अकोट शहर येथे आज शुभारंभ करण्यात आला. पोलीस स्टेशन अकोट शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने अकोट शहर पोलिस स्टेशनच्या सावली सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक गजानन शेळके, तसेच प्रमुख उपस्थितीत माया ताई म्हैसने, पोलिस निरीक्षक मिलिंद बहाकार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर ह्यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा,विविध कायदे, चांगला व वाईट स्पर्श इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले महिलांचे सबली करण, व सक्षमीकरण करण्या साठी व महिलांना स्वसंरक्षण व महिला विरोधी गुन्ह्या मध्ये कायद्याचे ज्ञान देण्या साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अकोट शहरातील व ग्रामीण भागातील महिला तसेच भूमी फाउंडेशन च्या चंचल पितांबेरवाले, JCI अकोट च्या सुनीता चायल, महिला पोलिस पाटील मोहिनी भंडारे,संगीता इंगळे,नलिनी इंगळे,अर्चना ठाकूर, वर्षा सोनोने शिक्षिका दीपाली सोळंके, बळेगाव व ज्योत्स्ना ठाकरे नरसिंग विद्यालय अकोट ह्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाला विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या, सूत्र संचालन ग्रामीण च्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे यांनी केले.तर शहरातील गणगणे विद्यालय व शिवाजी कॉलेज येथे सुद्धा विद्यार्थिनीच्या भरगच्च उपस्थिती मध्ये जननी 2 चा कार्यक्रम घेण्यात आला ज्या मध्ये पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्यांच्या पोलिस खात्यातील 25 वर्षाच्या अनुभवातून विद्यार्थिनींना एखादी अप्रिय घटना होऊ नये म्हणून मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर ह्यांनी महिला विषयक विविध कायद्यां बाबत माहिती दिली, कार्यक्रमाला उपप्राचार्य वाघ सर, कोठेकर सर, वैद्य मॅडम उपस्थित होत्या, जननी २ ही मोहीम 12 जुलै ते 22 जुलै दरम्यान दररोज वेगवेगळ्या शाळा कॉलेज मधून राबविण्यात येणार असून यात बालक पालक मीटिंग, ऑटो चालक, स्कुल बस चालक ह्यांच्या मीटिंग घेऊन सुरक्षितते बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तसेच 19 तारखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये भव्य कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कळविले आहे