चांदुर बाजार येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ग्राहकांची लूट

0
1873
Google search engine
Google search engine

35 रुपयांची तूरडाळ 55 रुपयाला,ग्राहकांची जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार ,
पुरवठा विभाग ला 2 दिवस झाले तरी माहिती नाही.

चांदुर बाजार:-

ग्राहकांना राशन दुकान मधून लाभ मिळावा या करिता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.तर चांदुर बाजार येथील काही राशन दुकानदार हे आपल्या आर्थिक स्थिती बकळत करण्यासाठी पहिल्यांदा तर तूरडाळ तुम्हाला मिळत नसल्याचे सांगतात.आणि त्याची इतरत्र विक्री करतात.मात्र शासन निर्णय असताना ही तूरडाळ ची विक्री ही 55 रुपये घेऊन होत असल्यासचा खळबळजनक प्रकार चांदुर बाजार तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अक्षय विजयराव देशमुख या दुकानदार कडून समोर आला आहे.या संदर्भात नागरिकांची दुकानदार यांची तक्रार चांदुर बाजार तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे केली आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या कडे तालुका पुरवठा विभाग लक्ष केंद्रित करून काय कार्यवाही करणार?हा प्रश्न उभा असतात राशन दुकानदार यांच्या कार्यवाही होणार की प्रकरण दडपले जाणार? हे पाहावे लागतील.मात्र आपल्या आर्थिक लाभ साठी नागरिक राशन दुकानदार यांच्याकडून ग्राहकांची लूट होणे काही जुनी गोस्ट नाही.मात्र पुरवठा विभाग यांच्या संपर्क केला असता अजून पर्यत तक्रार आमच्या कडे आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक गरिबाला राशन दुकान मध्ये धान्य उपलब्ध व्हावे.तसेच आवश्यक त्या कडधान सुद्धा उपलब्ध करून देण्याचा शासनाने मानस आहे.मात्र केवळ आपल्या स्वार्थी पना साठी चांदुर बाजार येथील राशन दुकानदार यांच्या लूट होत असल्याचा प्रकार आहे.यावर पुरवठा विभाग काय कार्यवाही करणार हे पाहावे लागतील.आणि तक्रार कर्ते याना न्याय मिळवा हीच अपेक्षा त्यांच्या कडून होते आहे.

प्रतिक्रिया:-
1)अजून पर्यत आमच्या कडे अशी कुठलीही तक्रार आली नाही.तहसीलदार यांच्या आदेशावर आम्ही आलेल्या तक्रार वर नक्की कार्यवाही करू.
रुपाली सोळंके पुरवठा निरीक्षक चांदुर बाजार

———————————————————————-

2)चांदुर बाजार शहरातील हा प्रकार अत्यंत गंभीर असून या वर पुरवठा विभाग यांनी चौकशी करून कार्यवाही करावी.
गोपाल तिरमारे नगरसेवक न.प.चांदुर बाजार

———————————————————————–