वेश्याव्यवसाय सुरु असणाऱ्या लॉजवर पोलीसांचा छापा

0
3818
Google search engine
Google search engine

         …………                      अनिल चौधरी, पुणे ………………….

हांडेवाडी येथील  लॉजवर सुरु असलेल्या सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश करत तीन मुलींची सुटका केली. हि कारवाई हडपसर भागातील हांडेवाडी येथील सौरभ संगम या लॉजमध्ये छापा मारून करण्यात आली. यावेळी शबाना इलही दखनी व राज रा. हडपसर यांना अटक करण्यात आली आहे.

हांडेवाडी येथील सौरभ संगम या लॉजमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती रेस्कू फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेने सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे  यांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे व  सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी,  हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे व कर्मचारी यांनी हडपसर परिसरातील गट नं. ४६५/१,हांडेवाडी येथील सौरभ संगम लॉजवर वेश्याव्यवसाया बाबत खातरजमा करुन छापा टाकण्यात आला. यावेळी दोन अल्पवयीन मुलीना व एक सज्ञान मुलीला वेश्याव्यवसायातून सुटका करून त्यांना वेश्याव्यवसायास भाग पाडणारी महिला एजंट शबाना इलहि दखनी (वय30 वर्षे) रा. शिवनेरी नगर , पूजा मंगल कार्यालयाजवळ, कोंढवा खुर्द पुणे व लॉज मॅनेजर यासीन इब्राहिम साहेब (वय३६) धंदा नोकरी, रा. सौरभ संगम हॉटेल, हांडेवाडी हडपसरपुणे मूळ गाव कापू , उडपी जिल्हा उडपी कर्नाटक यांच्या वीरध हडपसर पोलीस ठाण्यात ८१८/2018, पिटा अॅक्ट १९५६ चे कलम ३.४,५,६ सह भादवि ३७०, ३७०अ, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून रोख १६,५०० रुपये, एक मोबाईल व इतर कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील पिडीत मुलींना रेस्क्यू फाउंडेशन महमदवाडी येथे ठेवण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे गायकर , भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे,सपोनि अनिता खेडकर, पोउनि योगिता कुदळे, नामदेव शेलार, राजाराम घोगरे, प्रमोद म्हेत्रे, नितीन लोंढे, तुषार आल्हाट, सुनील नाईक, रेवणसिद्ध नरुटे, कविता नलावडे, गीतांजली जाधव, सुप्रिया शेवाळे, अनुराधा ठोंबरे, रुपाली नांदगुडे, सचिन शिंदे, यांनी व हडपसर पोलीस स्टेशनचे पोनि सुनील तांबे व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली.