संस्कार भारती शाखा अकोट ची कार्यकारणी जाहीर

0
866
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – संस्कार भारती शाखा अकोट ची कार्यकारणी नुकतीच एका बैठकीत घोषीत करण्यात आली. संस्कार भारती ही सामजीक संस्था सर्वप्रकारच्या कला क्षेत्रात कार्यकरणारी तथा नवोदीत कलावंतानां स्टेज उपलब्ध् करुन देऊन त्यांना वाव देणारी आहे. अश्या उद्देशाने कार्य करणारी अशी एकमेव संस्था संपुर्ण भारत भर कार्यरत आहे. हया संस्थेची स्थाापना गेल्या 10 वर्षा पुर्वी पासुन करण्यात आलेली आहे अश्या संस्थेची स्थानिक केशवराज मंदीर येथे नुकतीच सभा संपन्न झाली त्यामध्ये 2018-19 करीता अध्यक्ष मंजीरीताई लोखंडे, कार्याध्यक्ष् नंदुभाऊ शेगोकार यांची निवड करण्यात आली.

तसेच उपाध्यक्ष राजकुमारजी भगत, कोषाध्यक्ष श्री अरुणजी सांगळोदकर, मंत्री श्री अजयजी लोणकर, सहमंत्री हरीष ढवळे, सहमंत्री सुबोध उज्जेनकर, महीला संयोजीका सौ. ज्योतीताई राऊत, पुरातत्व व प्राचीन श्री अशोकजी टेंमझरे, चित्रकला श्री भुलगावकर सर, रांगोळी विद्या चंचल पितांबरवाले व सागर गवळी, संगित विद्या श्री वैष्ण्व बोरोडे, व विश्वास कुरवाडे, साहित्य् क्षेत्र मराठी अनघाताई सोनखासकर, साहित्य् विद्या हिंदी मिश्रा मॅडम, नाटय विद्या प्रदीप देशमुख, नृत्य् विधा जवंजाळ सर, अशी कार्यकारणी घोषीत करण्यात आली.बैठकीला विदर्भ् प्रांत कार्यध्याक्ष श्री सुधाकर अंबुसकर, विदर्भ प्रांत संघटन मंत्री श्री अजयजी देशपांडे मार्गदर्शक श्री सुधीरजी महाजन, मोहनराव सपकाळ, मोहनराव आसरकर, दिलीपजी हरणे, बाळु भाऊ देशपांडे, बहाळे मॅडम, माया ताई कोरपे, मनोज खंडारे उपस्थीत होते अशी माहीती प्रसिद्धी प्रमुख विजय जीतकार कळवितात.