मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द, मराठी भाषा विद्यापीठ लवकरच

0
1686
Google search engine
Google search engine

रिद्धपुर या ठिकाणी लवकरच मराठी भाषा विद्यापीठ होणार:-मुख्यमंत्री :-देवेंद्र फडणवीस
अमरावती दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनि दिला महानुभाव महंत याना शब्द

चांदुर बाजार:-
दि. 14-7-2018 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असताना त्यांनी महानुभाव आश्रम राजपेठ येथे गुरुवर्य प पु प म श्री मोठे बाबा यांच्या प्रकृती संबधी विचारपूस करण्यासाठी आले होते.
अमरावती येथे कार्यक्रमा निमित्त अमरावतीत आले असता ,0000

 

आश्रमा मध्ये भेटीसाठी आले व बाबांच्या प्रकृती संबंधी विचारपूस केली भेटी दरम्यान पूज्य श्री मोठे बाबा यांनी मुख्यमंत्र्यांना आपण लवकरच रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा करावी अशी सूचना केली त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की मी आपणास शब्द देतो लवकरच रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होईल. यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालक मंत्री प्रवीनजी पोटे अविनाश जी ठाकरे नागपूर , आ.अनिल बोडे आ. रवी राणा जेष्ठ पत्रकार नानाकजी आहुजा भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी तुषार भारतीय , किरणजी पातूरकर ,उपमहापौर संध्या ताई टिकले, प्रशांतजी वानखडे, डॉ. राजेंद्र तायडे, महंत वाईदेशकर बाबा म.तलेगांवकर बाबा म.भगत राज बाबा पुरुषोत्तम कारंजेकर (पुरुषोत्तम नागपुरे) म.जायराज बाबा कारंजेकर नरेंद्र पडोळे या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांचे आश्रमाच्या वतीने पु.श्री .मोहन दादा अमृते व आश्रमातील संत महंतांनी स्वागत केले.