दप्तरांच्या ओझ्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील शाळांना दिले निर्देश – तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई करणार

0
1276
Google search engine
Google search engine

मिडीया इम्पॅक्ट

चांदूर रेल्वे – ( शहेजाद खान )

शहरातील मुख्य मार्केटमधील एका शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थीनीच्या दप्तराचे वजन तब्बल ७ किलो आढळले होते. ही बातमी स्थानिक सोशल मिडिया व  वृत्तपत्रांतून प्रकाशित होताच गटशिक्षणाधिकारी खळबळून जागे झाले असून तालुक्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले आहे. दप्तराच्या ओझ्याबाबत तक्रारी आल्यास कारवाईचा इशारा सुध्दा गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी दिला आहे.

      राज्याच्या शिक्षण विभागाने २०१५ साली विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे घटवण्याबाबत एक परिपत्रक काढले होते. यानुसार शालेय विद्यार्थ्याच्या एकूण वजनापेक्षा त्याच्या दप्तराचे ओझे एक दशांशपेक्षा जास्त असू नये, असे नमूद करण्यात आले होते. परंतु सुरुवातीपासूनच चांदूर रेल्वे तालुक्यात याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत होता. यामुळे विद्यार्थी दप्तराचा ५ ते ८ किलोचा भार वाहत आहे. शहरातील मुख्य मार्केटमधील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थीनीच्या दप्तराचे वजन केले असता ते तब्बल ७ किलो आढळून आले. विद्यार्थीनीचे वजन ३३ किलो होते. विद्यार्थीनीच्या वजनानुसार तिच्या दप्तराचे वजन ३ किलोपेक्षा कमी असणे आवश्यक होते. मात्र तसे आढळून आले नाही. ऐवढ्या मोठ्या वजनामुळे अनेक मुले पाठ, मान, मनका दुखत असल्याच्या तक्रारी करतात. यामुळे शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाची बातमी वृत्तपत्रातून प्रसिध्द होताच गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासण्याचे निर्देश दिले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार शिक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी सांगितले.