रा.स.प.लढणार अकोला जि.प. व पं.स.निवडणुक

1147

आकोट/ संतोष विणके – राष्ट्रीय समाज पक्ष आगामी अकोला जिल्हा परीषद व पंचायत समीतीच्या निवडणुक लढणार असल्याची माहीती रासपच्या वतीने देण्यात आली.रासपचे अकोला जिल्हाध्यक्ष सतीष हांडे यांच्या वडीलांच्या ११ व्या पुण्यस्मृती निमित्य रासपचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन ,दुग्धविकास व मत्सविकास मंञी ना.महादेव जानकर हे आकोट दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी रासपच्या कार्यकर्ता पदाधीकारींशी चर्चा करुन आगामी जिल्हा परीषद पंचायत समीती निवडणुक लढण्याबाबत आढावा घेतला.पोपटखेड रोडवरील विश्रामगृह येथे त्यांनी कार्यकर्ता पदाधीकारीं तथा पञकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा सल्ला दिला.याप्रसंगी त्यांनी अकोला जिल्हाध्यक्ष सतिश हांडे यांच्या कार्यांच कौतुक करुन समाधान व्यक्त केलं.तत्पुर्वी त्यांनी कै.दत्तुजी हांडे यांच्या ११ व्या पुण्यस्मृती निमित्य आयोजीत हभप.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कार्यक्रमस्थळी भेट देऊन कै.दत्तुजी हांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.यावेळी उपस्थीत नागरीकांशीही त्यांनी संवाद साधला.

जाहिरात