चोऱ्यांचा तपासात पोलीसांना अपयश – अद्यापही चोरांचा नाही लागला सुगावा …. व्यापाऱ्यांमध्ये दहशत कायम

0
739
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

      चांदूर रेल्वे शहरात तीन दिवसांपुर्वी एकाच रात्री एक दुकान, २ पानठेले फोडले असून एका किराणा दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याची घडना घडली होती. मात्र अद्यापही चोरट्यांचा तपास लावण्यात चांदूर रेल्वे पोलीसांना अपयश आले आहे.

    सविस्तर माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चांदूर रेल्वे शहरातील स्टेट बँकेजवळील चांडक कृषी केंद्राचे कुलुप तोडून ३० हजारांची रोकड, शेख आसीफ शेख गफ्फार यांचा मुख्य चौकातील पानठेला फोडून ८ हजारांचा ऐवज तसेच गाडगेबाबा मार्केटमधील ओमप्रकाश मानकर यांचा पानठेला फोडून ३ हजार रूपये रोख चोरून नेले होते. याशिवाय मुख्य रस्त्यावरील लाखानी यांच्या कस्वा किराणा दुकानाचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहरात एकाच रात्री एकुण ३ ठिकाणी चोरी करून एका दुकानात चोरीचा प्रयत्न केला. मुख्य रस्त्यावरील दुकानातच चोऱ्या होत असल्यामुळे पोलीस प्रशासन काय करत आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतांना पोलीस प्रशासन मात्र चोरट्यांचा सुगावा लावण्यात अयशस्वी झाले आहे. चोरीचा तपास पीएसआय बी. यु. लसंते करीत असतांना त्यांना एकाही चोरट्याचा अटक करण्यात यश आले नाही. अजुनही तपास सुरू असल्याचे लसंते यांनी सांगितले. त्यामुळे पोलीसांना चोरट्यांचा शोध कधी लागेल ? हे येणारा काळच सांगेल. शहरातील व्यापारी वर्गात दहशत अजुनही कायम आहे.