चांदुर बाजार आगार मध्ये विध्यार्थी यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम

0
996
Google search engine
Google search engine

बसस्थानक मधील ते वॉटर कुलर नादुरुस्त अवस्थेत, विध्यार्थी यांचा मोठा प्रमाणावर छळ,विना थांबा च्या बसेसची निश्चित प्लेटफ्रॉम नाही.

चांदुर बाजार:-
स्थानिक चांदुर बाजार या ठिकाणी असणाऱ्या बस स्थानक अनेक समस्या नि भरले असल्याचे दिसून येते आहे.या ठिकाणी विध्यार्थी याना मिळणाऱ्या पासेस,बस वेळेवर न लागणे, तसेच फलक न लावता बसेस प्रवास साठी सोडण्यात येतात.यात प्रवाशी याना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.मात्र या कडे प्रशासन लक्ष कधी देणार हा प्रश्न आहे.

चांदुर बाजार बसस्थानक मध्ये वाटकूलर भेट म्ह्णून देण्यात आले होते.मात्र त्याचे देखभाल योग्य प्रकारे न झाल्याने त्याला नादुरुस्त असल्याचे दिसत आहे.त्यामुळे प्रवाशी तसेच विध्यार्थी वर्ग यांचा पिण्याचा प्रश्न कायम आहे.त्यामुळे प्रवाशी वर्ग आणि विध्यार्थी याना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करताना दिसते.तर या ठिकाणी योग्य आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणयात यावी अशी मागणी होते आहे.

चांदुर बाजार बस स्थानक हे नगर परिषद हद्दीत येत असून या कडे चांदुर बाजार नगर परिषद कधी लक्ष देणार ही सुद्धा महत्त्वाची बाब ठरते आहे. तर आगार हे शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीत येते मात्र आगार मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ तर आहे मात्र बस स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करताना दिसून येते आहे.यावर आगार प्रमुख कधी लक्ष देणार हा सुद्धा प्रश्न आहे.

चांदुर बाजार वरून अमरावती ला रविवार सोडून रोज विना वाहक बसेस सोडण्यात येतात मात्र तिकीट बुकींग झाल्यानंतर बसेस ची निश्चित वेळ नसल्याने प्रवाशी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे अनेक समस्या नि वेढलेले असलेले चांदुर बाजार येथील बसस्थानक यांच्या समस्या कधी सुटणार हे पाहावे लागतील.तर या ठिकाणी दोनच सुरक्षा रक्षक असल्याने त्यांची सुरक्षा फक्त आगार दिली जाते.मग प्रवाशी आणि विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी कोण येणार हे पाहावे लागतील.या पूर्वी या ठिकाणी चार सुरक्षा रक्षक कर्मचारी असल्याची माहिती आगार प्रमुख यांनी दिली.

प्रतिक्रिया:-
1)चांदुर बाजार बस स्थानक या ठिकाणी विना बसेस थांबा साठी नियोजित प्लँटफ्रॉम नसल्याने प्रवाशी यांची चांगली तारांबळ उडते त्यामुळे व्यवस्थापक यांनी याकडे लक्ष देण्याची आणि यावर उपाययोजना करणे महत्वाचे आहे .


:-मदन भाटे प्रवाशी मित्र मंडळ सदस्य
*————————————————————————————*
2)या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच .त्यासाठी आम्ही वरिष्ठ कडे हा प्रश्न सोडण्यासाठी पाठपुरावा केला मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.या बाबत नगर परिषद ने आम्हाला पाणी पुरवठा करण्यात यावे.त्यामुळे प्रवाशी यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतील. तसेच विना बसेस साठी लवकरच वेगळा प्लेटफ्रॉम तयार करू.आणि सुरक्षेतेच्या दृष्टीने लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतील.


अरुण सीरसाठ आगार प्रमुख चांदुर बाजार