खरेदी न झालेल्या शेतात रायगड प्रकल्पाच्या भिंती *शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्ते केले बंद

0
907
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- (शहेजाद  खान) 
तालुक्यातील पळसखेड मध्ये सुरू असलेल्या रायगड प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या नाहीत अशा शेतकऱ्यांच्या जमिनीवर खोद काम करून भींती टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
     चांदूर रेल्वे वरून ८ कि. मी. अंतरावरील पळसखेड येथे सन २००७  पासून रायगड प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्पा मध्ये पळसखेड, कवठा कडू, दिघी कोल्हे, कोहळा, एकपाळा, धानोरा मोगल या गावातील शेतजमिनी गेल्या व गेल्या सात ते आठ वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात गेलेल्या जमिनीची खरेदी केल्या व काम सुरू केले. पण काही कालांतराने जसजसे काम होत गेले तस तशी जमिनी अधिक खरेदी होत गेल्या. मात्र काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी न करता शेतकाऱ्यांना न विचारता त्यांच्या शेतात भींती टाकून त्या शेतात  खोदकाम करण्यात आले. त्यामुळे यावर्षी त्या शेतकऱ्याच्या पिकात पावसाचे पाणी साचून त्याचे पूर्ण पीक खराब झाले. त्यांच्या शेतात दोन वर्षाआधी ही भिंत टाकण्यात आली होती. प्रत्येक वेळी प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सांगण्यात आले मात्र त्याची दखल कोणीही घेतली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात प्रकल्पाचे  अधिकारी आले असता  चुकीने तुमचे शेत खरडल्या गेले असे त्या शेतकऱ्याला सांगितले. पन अजूनपर्यंत त्यांचे शेत पूर्ववत केले नाही. सोबतच शेतकऱ्यांचा  जाण्या-येण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले. प्रकल्पाच्या सोयीनुसार त्यांनी मोठमोठ्या नाल्या खोदून शेतकऱ्यांचे शेतात जाणारे रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतात कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
     मी एक वर्षापासून रायगड प्रकल्प अधिकाऱ्यांनसोबत संपर्क साधत आहे. माझ्या शेताची खरेदी न करता माझ्या शेतात खोदकाम करण्यात आले आणि माझ्या शेतात जाण्या येण्याचा रास्ता सुद्धा बंद केला. त्यामुळे मी शेतात जाऊ कसा ? आणि माझ्या शेतात टाकलेल्या भिंती मुळे शेतात पाणी साचले. मी याची तक्रार उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांच्याकडे केली आहे.
नारायण मते, शेतकरी पळसखेड