*आ.डॉ.अनिलजी बोंडे यांचे शेतकयांसाठी विकासाचे आणखीन एक पाऊल पुढे – पशु संवर्धन मंत्री महादेवराव जानकर यांच्याहस्ते पशुवैद्यकीय लघु सर्वचिकित्सालयाचे लोकार्पन*

0
1298
Google search engine
Google search engine

मोर्शी येथे २ कोटी ४६ लक्ष रुपयांतून उभारण्यात आलेल्या नवनिर्मित तालुका पशुवैद्यकीय लघु सर्वचिकित्सालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय मंत्री महादेवराव जानकर यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक २१ जुलाई २०१८ दुपारी १२ वाजता पार पडणार आहे.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी राज्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.श्री.प्रविनजी पोटे पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री.रामदासजी तडस, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिलजी बोंडे, तिवसा मतदार संघाचे आमदार यशोमतीताई ठाकूर,मोर्शी शहराचे नगराध्यक्षा सौ शीलाताई रोडे, यांच्या सोबतच प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे, मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणी, मर्या. मोर्शी अध्यक्षा डॉ.सौ.वसुधाताई बोंडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ विजय भोजने, मोर्शी पंचायत समिती सभापती शंकर उईके, मोर्शी शहराच्या उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड, सारंग खोडस्कर, संजय घुलक्षे, अनिल डबरासे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. पशुवैद्यकीय लघु सर्वचिकित्सालयाचे लोकार्पणाच्या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोर्शी भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.