पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना पोलिसांना रंगेहाथ पकडले

0
2140
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे

खाजगी जागेवरील पार्किंग सुरु ठेवण्यासाठी व त्यांचेवर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक  सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग सीताराम ढोकरे (वय ५६ ) व पो.ना. संतोष म्हाळू इरणक (वय ४०) यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलीस स्टेशन, ठाणे येथे  एसीबीने पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत  सविस्तर माहिती देताना अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) चे  उप अधिक्षक अंकुश बांगर म्हणाले कि, एका इसमाने एसीबीकडे तक्रार केली कि , त्याच्या खाजगी जागेवर पार्किंग सुरु ठेवायची होती. पण सपोनि ढोकरे व पोना इरनक हे त्यांच्यावर खाजगी जागेत पार्किंगचा व्यवसाय केल्यास कारवाईची धमकी देत होते. तक्रारदारांशी कारवाई न करण्यासाठी दोघांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. लाच दिल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत याची खात्री झाल्यावर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा करून एसीबीचे उप-अधीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने नारपोली पोलीस स्टेशन , ठाणे शहर  या पोलीस ठाण्यात सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सपोनि निरीक्षक बजरंग सीताराम ढोकरे (वय ५६ ) व पो.ना. संतोष म्हाळू इरणक (वय ४०) यांना पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडण्यात आले असून त्या दोघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.  एसीबीचे उप-अधीक्षक अंकुश बांगर पुढील तपास करत आहेत.

शासकीय/ खाजगी  लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) कडे नागरिकांनी 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.