नया अमरावती रेल्वे स्टेशन वरून शेकडो वारकरी पंढरपुराला रवाना-भाजप नेते तुषार भारतीय यांनी दाखविली हिरवी झेंडी ><वारकरीसह चालक-सहचालक यांचा सत्कार

0
1590
Google search engine
Google search engine

तुषार भारतीय मित्र परिवार तर्फे साबुदाणा खिचडी व चहा वाटप सह आरोग्य तपासणी , रक्तगट तपासणी , मोफत औषध वाटप

 

 

दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥” संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी ‘माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥” हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होण्यासाठी आज नया अमरावती रेल्वे स्टेशन वरून शेकडो वारकरी पंढळपुरला रवाना झाले .महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग व रुख्मिणी यांच्या दर्शनाकरिता वारकरी भक्त आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र पंढरपूरला जातात. वारकऱ्यांची सेवा करण्याच्या दृष्टीने दरवर्षी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या पुढाकाराने वतीने साबुदाणा खिचडी , चहा वाटप , मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी तसेच औषधी वितरण करण्यात आले .या आनंददायी व नेत्रदीपक सोहळाच साक्षीदार व्हाण्याकरितातुषार भारतीय मित्र परिवार , गाडगे बाबा रक्तपेढी , स्वच्छ भारत स्वस्थ भारत ग्रुपचे सदस्य भाजपचे नगरसेवक , पदाधिकारीप्रामुख्याने उपस्थित होते .