खडकमाळेगाव येथील रायतेवस्ती जिल्हा परिषद शाळेची आषाढी दिंडी उत्साहात साजरी

0
1264
नाशिक :- उत्तम गिते –
खडकमाळेगाव येथील रायतेवस्ती जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यानी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामचा गजर करत परिसरात दिंडी काढली.
याप्रसंगी बालगोपाळानी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती.वारकरी पेहरावात हातात टाळ, कपाळी अष्टगंध,खांद्यावर भगवी पताका, मुलींच्या डोक्यावर तुळशी कळस व मुखाने ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत चिमुकल्या वारक-यांनी काढलेल्या दिंडीने लक्ष वेधले.
दिंडीत वृक्षारोपन, पर्यावरण व स्वच्छता यावर घोषणा देत प्रबोधन करण्यात आले. टाळ्यांचा गजरात माऊली माऊलीचा गजर करीत परिसर माऊलीमय केला. या दिंडीत सर्व  पालकही सामील झाले होते दिंडीत जयजय रामकृष्ण हरि, ज्ञानोबा- तुकाराम, विठठल नामाच्या गजराने परिसरात भक्तीमय वातावरण तयार झाले होते . विशेष म्हणजे महिलांनी फुगडी खेळून दिंडीला रंगत आणली.
दिंडीत वीणेकरी, टाळकरी, वारकरी मोठय़ा  उत्साहात सहभागी झाल्याने दिंडीला रंगत आली होती
यावेळी आप्पासाहेब क्षिरसागर,पंढरीनाथ रायते,संजय रायते,प्रकाश रायते,संपत रायते,विकास रायते,प्रमोद रायते,रविंद्र रायते,दत्तात्रय रायते,वाल्मिक रायते,सागर रायते,चेतन रायते,संदिप राजोळे,रविंद्र राजोळे,स्वप्निल राजोळे,सरला साळवे,संगिता रायते,आदींसह शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले