जुगार वर ठाणेदार अजय आकरे यांची कार्यवाही

0
923

जुगार वर पोलीस साची धडक कार्यवाही,जुगार साहित्य आणि आरोपी अटकेत,

शुक्रवार रात्री 9 च्या दरम्यान शिरजगाव बंड या ठिकाणी चांदुर बाजार पोलिसांची कार्यवाही

चांदुर बाजार:-क्राइम रिपोटर

पोलीस स्टेशन चांदुर बाजार हद्दीत येणाऱ्या शिरजगाव बंड येथे दिनांक 20 जुलै च्या रात्री 9 च्या दरम्यान गोपनीय माहितीचे आधारे जुगार रेड करण्यात आली. यामध्ये पोलीस यांनी 4 आरोपी याना घटना स्थळावरून अटक केली.या मध्ये आरोपी नामे 1) जितेंद्र विश्वासराव वासनकर,2)एजाज खान शहदात खान पठाण,3)मनिष सुधाकर नामकरण,4)शुभम पंत लोखंडे आहे. तर त्यांच्याकडुन मोटारसायकल, मोबाईल आणि नगदी 2600/रू असा 85875/रू चा माल जप्त करण्यात आले आहे.
ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदुर बाजार पोलीस स्टेशन मधील नापोशि नितीन डोंगरे, निकेश नशिबकर,भूषण पेठे, विरेंद्र अमृतकर,(पोलीस स्टेशन खुफिया)अरविंद गावडे (ठाणेदार रायटर) यांनी केली.