अॅड. खोजरे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा चांदूर रेल्वे वकील संघाने नोंदविला निषेध – एक दिवस कोर्टाचे कामकाज होते बंद <> चांदूर बाजार पोलीसांनी केली होती कारवाई

0
981
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

      अचलपुर येथील व बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा चे वकिल सदस्य खोजरे यांच्यावर चांदूर बाजार पोलीसांनी केलेल्या अन्यायाचा स्थानिक वकिल संघाने तिव्र निषेध व्यक्त करीत एक दिवस कामकाज बंद ठेवले होते.

      अचलपुर येथील वकिली व्यवसाय करणारे अॅड. खोजरे यांना चांदूर बाजार पोलीसांनी सर्व नियम धाब्यावर बसवून अतिशय अपमानास्पद पध्दतीने कोणतीही पुर्वसुचना न देता रात्रीच्या वेळी सराईत गुन्हेगाराप्रमाणे अटक केली. तसेच त्यांच्यासोबत अमानुष व्यवहार करून वकिली व्यवसाय करणाऱ्या राज्यातील संपुर्ण वकिलांचा अपमान केला असल्याने या घटनेबाबत चांदूर रेल्वे वकिल संघाने निषेध व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

      यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. एम. व्ही. देशमुख, उपाध्यक्ष अॅड. आर. एन. अंबापुरे, सचिव अॅड. पी. एम. कुळकर्णी, कोषाध्यक्ष अॅड. एस. एस. अग्रवाल, सदस्य अॅड. एस. आर. मकेश्वर, अॅड. आर. एन. काळे, अॅड. एम.सी. वाल्दे, अॅड. ए. एम. जिचकार, अॅड. एस. पी. भुयार, अॅड. जे. सी. मैंद आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया 

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी – अॅड. एम. व्ही. देशमुख

अचलपुर येथील जेष्ठ वकिल अडॅ. खोजरे यांना चांदूर बाजार पोलीसांनी केलेली अमानुष मारहाण व अपमानास्पद बागणुक ही घृणास्पद बाब आहे. याचा मी तिव्र निषेध व्यक्त करतो. यामधील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एम. व्ही. देशमुख यांनी व्यक्त केली.

कायद्याच्या रक्षकाला अशी वागणुक अपेक्षीत नाही – अॅड. राजीव अंबापुरे

कोणत्याही गुन्ह्याची चौकशी करण्याचा पोलीसांना हक्क असला तरी कायद्याची पायमल्ली करण्याचा त्यांना अधिकार नाही. जेष्ठ वकील असणाऱ्या व्यक्तीस एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन मारहाण करणे हे निश्चितच वाईट आहे. कायद्याच्या रक्षकाला अशी वागणूक देणे पोलीस विभागाकडून अपेक्षीत नसल्याची प्रतिक्रीया वकिल संघाचे उपाध्यक्ष अॅड. राजीव अंबापुरे यांनी दिली.

वकिलांना अपमानास्पद वागणुक देणे निंदनीय – अॅड. एस. पी. भूयार

वकील हा कायद्याचा रक्षक असून कायद्यासाठी वकीलाचे फार मोठे योगदान आहे. अॅड. खोजरे यांना अटक करून अपमानास्पद वागणूक देणे निंदनीय कृत्य असल्याचे मत जेष्ठ वकील अॅड. एस. पी. भूयार यांनी व्यक्त केले.

वकिल आरोपी ठरू शकत नाही – अॅड. श्री अरूण जिचकार

वकिल हा कोर्टाचा एक भाग असून त्यांनी दिलेला सर्च रीपोर्ट चुकीचा निघाल्यास प्रथम त्याची चौकशी होणे महत्वाचे आहे. मालमत्तेविषयी वकिलाचे फक्त मत असते. त्याची इतर जबाबदारी बँकेची असून वकील आरोपी ठरू शकत नाही. परंतु इतर कोणतीही चौकशी न करता व पुर्वसुचना न देता अॅड. खोजरे यांना केलेली अटक निंदनीय असल्याचे मत अॅड. अरूण जिचकार यांनी व्यक्त केले.

हे तर कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन – अॅड. श्री संजय मकेश्वर

रात्रीला घरी जाऊन अॅड. खोजरे यांना केलेली अटक निश्चितच अयोग्य असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. वकिल किंवा डॉक्टर यांना अटक करण्यापुर्वी संबंधितांना पुर्वसुचना देऊन चौकशी होणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया अॅड. संजय मकेश्वर यांनी दिली.

असे कृत्य सहन करून घेणार नाही – अॅड. एम. सी. वाल्दे

अॅड. खोजरे यांना केलेली अटक चुकीची आहे. अश्या प्रकारची कार्यवाही वकिलांविरूध्द पोलीस प्रशासनाकडून केल्या जात असेल तर असे कृत्य वकिल कधीही सहन करून घेणार नाही. पोलीसांनी अधिकाराचा दुरूपयोग केला आहे. दोषींवर फौजदारी कार्यवाही व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रीया अॅड. एम. सी. वाल्दे यांनी व्यक्त केली.


हा तर राज्यातील सर्व वकिलांचा अपमान – अॅड. जयंत मैंद

जेष्ठ वकिल अॅड. खोजरे यांना चांदूर बाजार पोलीसांनी नियम धाब्यावर बसवून रात्रीच्या वेळी मोठ्या गुन्हेगाराप्रमाणे अटक करून व त्यांच्यासोबत अमानुष व्यवहार करून राज्यातील संपुर्ण वकिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरूध्द कार्यवाही करण्यात यावी अन्यथा वकिल संघामार्फत पुढील आंदोलन तिव्र करणार असल्याचे अॅड. जयंत मैंद यांनी सांगितले.