सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभरात १०९ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन !

0
956
Google search engine
Google search engine
डावीकडून श्री. नीलेश टवलारे, सौ. विभा चौधरी, श्री. गिरीश कोमेरवार,  सौ.चारूलता भूमराळकर.
 Amravati :-
हिंदूंच्या लक्षावधी वर्षांच्या संस्कृतीतील अद्वितीय परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले आणि आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची स्थापना केली. या परंपरेविषयी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करणे, अनादी काळापासून चालू आहे. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांसह यंदा देशभरात १०९ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे, असे सनातन संस्थेने कळवले आहे.
            या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन; हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य या विषयावरील लघुपट; समाज, राष्ट्र आणि धर्म यांप्रती कृतीशील मान्यवरांचे विचार, तसेच  सेक्युलर लोकशाही आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र या विषयावरही मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात आपत्काळात समाजसाहाय्यासाठी आवश्यक प्रथमोपचार प्रात्यक्षिके आणि बचाव अन् आक्रमण शिकवणारी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहेत.
      हा गुरुपौर्णिमा महोत्सव आषाढ पौर्णिमा, शुक्रवार, २७ जुलै २०१८ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शुभम मंगलम, दसरा मैदानसमोर, बडनेरा रोड, अमरावती या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने आज संपन्न झालेल्या पत्रकार परीषदेमध्ये करण्यात आले. ही पत्रकार परीषद हॉटेल राधेय इन मध्ये पार पडली. यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने सौ. विभा चौधरी, श्री. गिरीष कोमेरवार, सौ. चारूलता भुमराळकर तसेच हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वय श्री. नीलेश टवलारे उपस्थित होते