कोंढव्यात शांततेत मोर्चाचे आयोजन

0
1096
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे

मराठा सेवक कै. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कोंढवा खुर्द येथील ग्रामदैवत कालभैरवनाथ मंदिरासमोर सकल मराठा समजाच्या वतीने व ग्रामस्थांच्या तसेच सर्व पक्षीय नेतांच्या वतीने कै.काकासाहेब शिंदे  यांना श्रद्धांजली अर्पण करून  आज ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर ते वीर तानाजी मालुसरे चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नरवीर तानाजी चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला. मोर्चा शांततेत पार पडला असून मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याची मागणी यावेळी सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यावेळी कोंढवा भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

सरकारने दोन वर्ष मराठा समाजाची पिळवणूक, फसवणूक केली. त्यामुळे आता मूक नाही ठोस मोर्चा काढण्याचा निर्धार राज्यात मराठा समन्वय समितीने केला होता. कोंढवा खुर्द ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने कोंढवा भागातील सर्व व्यावसायिकांना आपले व्यवहार, दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कोंढव्यातील दुकानदारांनी आपली दुकाने उस्फूर्तपणे बंद ठेवून मराठा आरक्षण मागणीस पाठींबा दिला असे पहावयास मिळाले. मराठा समाजाचा अपमान आणि अन्यायाविरुद्ध हा बंद पुकारल्याच मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी सांगितल आहे.

याप्रंगी मा.आ.महादेव बाबर, नगरसेवक साईनाथ बाबर, मा.नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, संजय लोणकर,नारायण लोणकर, मदन शिंदे, लक्ष्मण लोणकर, ज्ञानेश्वर भोईटे,गणेश रावडे, दादा लोणकर, प्रकाश काटे, महेंद्र गव्हाणे, दिनेश गव्हाणे, महेश आबा लोणकर, प्रशांत लोणकर, संतोष गोरड,लक्ष्मण रोकडे, विलास कापरे आणि कोंढवा खुर्द ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक विभागाचे महिला उपनिरीक्षक म्हस्के व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूकीवर चोक नियंत्रण ठेवले होते .