चांदूर रेल्वेत मराठा आरक्षणासाठी एसडीओंना निवेदन – काकासाहेब शिंदेना वाहिली श्रध्दांजली

0
1178
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
     मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा या मागणीसाठी चांदूर रेल्वेत मराठा समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांना मंगळवारी निवेदन दिले.
     मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील स्व. काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यामुळे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यासोबतच सरकारचा निषेधसुध्दा नोंदविण्यात आला. यावेळी गजानन यादव, अर्जुन बाबर, श्रीकांत माने, संदीप जरे, उमेश बाबर, सागर गरुड, सारंग तेलकुंटे, गजानन सूर्यवंशी, विजय मिसाळ, प्राविण्य देशमुख, अभिजित मिसाळ , अनंता पोलाड, रोशन नागने, अजय देसाई, विलास उईके, कुणाल इंगळे, पिंटु यादव यासंह शेकडो मराठा समाजबांधव उपस्थित होते.
चांदूर रेल्वेत बंदला प्रतिसाद नाही
मंगळवारी मराठा आरक्षणासाठी संपुर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली असतांना त्याचा प्रतिसाद चांदूर रेल्वेत दिसला नाही. नेहमीप्रमाणे चांदूर रेल्वेतील बाजारपेठ सुरू होती. मात्र येत्या काळात बंदच्या नियोजनावर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्थानिक समाज बांधवांनी सांगितले.