आज २७/२८ जुलै २०१८ शुक्रवारी आषाढ़ शुक्ल गुरू पौर्णिमा खग्रास चंद्रग्रहण

0
1655
Google search engine
Google search engine

खग्रास चंद्रग्रहण (संधर्भ : दाते पंचांग)
आहे हे ग्रहण भारतात सर्वत्र खग्रास दिसणार आहे.
वेधारंभ:-हे ग्रहण सुरु होण्याच्या *तीन*
प्रहर आधी म्हणजे
दुपारी १२:४५ मी.पासून ग्रहण मोक्षपर्यंत वेध पाळावे
आजारी,अशक्त व्यक्ति व गर्भवती स्रीया यांनी सायंकाळी ०५:३०मी पासून वेध पाळावेत
ग्रहण पर्व:- ०३ तास ५५ मिनिटे
ग्रहण स्पर्श दि. २७ तारीख रात्रि ११:५४ मी वाजता
ग्रहण सम्मिलन दि.२८ तारीख रात्रि ०१:०० वाजता
उन्मूलन रात्रि ०२:४४ वाजता
मोक्ष रात्रि ०३:४९ वाजता (समाप्ति)
ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.
पुण्यकाल: ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल “पुण्यकाल” आहे.
लहान मुले, वृद्ध व गर्भवतीस्त्रियांनी सायंकाळी ५:३० मी. पासून गहानाचे नियम पाळावेत.
वेधातील कृत्य : ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देव पूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे, पुरीव घेतलेल्या मंत्राचा पूरश्चरण चंद्र ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षांनंतर स्नान करावे. ग्रहणकालामाध्ये झोप, मलमुत्रोस्तर्ग, अभ्यंग, खाणे पिणे, आणि कामविषयसेवन हि कर्मे करू नये.
ग्रहणाचे राशीपरर्त्वे फल:
मेष, सिंह, वृश्चिक, मीन :- शुभ
वृषभ, कर्क, कन्या, धनु :- मिश्र
मिथून, तुला, मकर , कुंभ :- अशुभ फल.
ज्यांना अशुभ आहे त्यांनी तसेच गर्भवती स्त्रियांनी ग्रहण फाहू नये.