गुरूपोर्णीमेनिमीत्त राष्ट्रीय हायस्कूल येथे गुरूशिष्य वेशभूषा स्पर्धा संपन्न

0
1458
Google search engine
Google search engine
अचलपूर:-राजस्थानी महीला मंडळ व राष्ट्रीय हायस्कूलअचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूपोर्णीमेनिमीत्त गुरूशिष्य वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच गुरूपुजन करण्यात आले.
अचलपूर शहरातील राजस्थानी महिला मंडळ व राष्ट्रीय हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राष्ट्रीय हायस्कुल येथे २७ जुलै रोजी भव्य गुरूशिष्य वेशभूषा स्पर्धा व गुरूपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद नैकेले प्रमुख अतिथी सरीता अग्रवाल अध्यक्ष अखील भारतीय मारवाडी महिला मंडळ,ज्योती तांबी सचिव, सुमनजी चौधरी प्रादेशिक अध्यक्ष बालविकास समीती, मोनाजी सीरोया प्रमुख बालविकास समीती व ममता तिवारी पर्यवेक्षक राष्ट्रीय हायस्कूल यांचे प्रमुख उपस्थितीत गुरूशिष्य वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक ममता तीवारी, आभार राजश्री रामटेके संचलन राधीका बैस तर कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापक एस.डी.झंवर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्याने केले.
वेशभूषा स्पर्धेत दिव्या जयसिंगपूरे,वेदिका घुलक्षे, ओम ढाकुलकर,कृष्णा खुंटे,आदिती हांडे, महती मोहोड,अनुजा जांभे,गौरी नांदुरकर,वेदांत देंडव,रिया ठाकूर, कोमल श्रीवास,निधी कुकर्डे,जाणवी भोपळे, वैष्णवी नांदुरकर,स्वराज तट्टे,आदित्य पोतले,गौरी सदाफळे,तनवी लील्लोरीया आदी वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यांना या करीता उत्तम मार्गदर्शन भारती सदाफळे,राधीका बैस यांनी तर त्यांना सहकार्य ममता ठाकुर,रजनी निमकर यांनी केले.स्पर्धेचे परीक्षण दिलीप बोबड,विश्वजीत बोंडे व सुशिला अग्रवाल यांनी केले यामध्ये प्रथम क्रमांक महर्षि सांदिपनी व श्रीकृष्ण ची वेशभूषा वठवीणारे आदिती हांडे व वेदिक घुलक्षे, द्वितीय आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त कोमल श्रीवास व निधी कुकर्डे तर तीसरा क्रमांक समर्थ रामदास व छ.शिवाजी महाराज बनलेल्या जानवी भोपळे व वैष्णवी नांदुरकर यांना देण्यात आला उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच राजस्थानी महीला मंडळाचे वतीने सर्व गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सागर मानमोडे,राजू केदारे, कैलाश गायकवाड व प्रशांत कोल्हे यांनी विशेष परीश्रम घेतले कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,अखील भारतीय मारवाडी महीला मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते.