बांगलादेशामध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

0
1250
Google search engine
Google search engine

बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! भारतातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण कसे करणार ?

ढाका – २३ जुलै २०१८ या दिवशी काही धर्मांधांनी बांगलादेशाच्या शेरपूर जिल्ह्यातील नलिताबारी उपजिल्ह्यामध्ये मोहसौशान काली मंदिर आणि खलभंग सार्वजनिक काली मंदिर यांमध्ये घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने ही कृती करण्यात आली. स्थानिकांनी मंदिरांवरील आक्रमणाविषयीची माहिती पूजा उज्जापन परिषदेचे अध्यक्ष श्री. अरुण सरकार यांना दिली. श्री. अरुण सरकार यांनी नंतर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हेगारांना पकडलेले नाही.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना मंदिरांवरील आक्रमणाचे वृत्त कळताच त्यांनी नलितबारी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून ‘गुन्ह्यातील दोषींना तातडीने अटक करण्यात यावी. गुन्हेगारांच्या विरोधात प्रचलित कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी. तसेच मंदिरांतील मूर्तींची पुनर्स्थापना करण्यात यावी’, अशी मागणी केली.