दर्यापुर नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात ९ अॉगस्ट कांतीदिनी प्रहारचे जनआंदोलन –  नगर परिषद प्रशासनास  ८ दिवसाचा अल्टीमेटम

0
1100

प्रतिनिधी / दर्यापुर

दर्यापुर शहरातील नगर परिषद अंतर्गत परिसरातील रस्ते , रस्त्यावरील खड्डे, नाल्या तात्काळ दुरूस्ती करण्यात याव्यात याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांनी उप मुख्याधिकारी दादाराव इंगळे यांना निवेदन सादर केले असून निवेदनातील मागणी नुसार शहर परिसरातील रस्ते, व नाल्याची दुरावस्था झाली असून रस्त्यानवर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने जागोजागी डबकी साचली असून नाल्या तुडूंब भरल्या आहेत.नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरकाव करित आहे.स्वच्छता व साफसफाई कडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असून निष्क्रिय प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे शहरातील लोकांना आरोग्यांचा प्रश्न निर्माण होऊन लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शहरातील रस्ते ,सांड पाण्याची व्यवस्था व परिसरातील साचलेले कच-याचे ढिगारे यामुळे शहरातील जागोजागी घानीचे सामराज्य पसरले आहे.याबाबत नगर परिषद प्रशासनाने त्वरित उपाययोजना करुन शहरातील परिसरातील रस्ते दुरूस्ती व साफ सफाई दिलेल्या वेळेच्या आत करण्यात यावी.अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक ९ अॉगस्ट कांतीदिनी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विधानसभा प्रमुख प्रदिप चौधरी यांनी दिला आहे यावेळी निवेदन सादर करतांना प्रदिप वडतकर यांच्या सह प्रदिप चौधरी , डॉ दिनेश म्हाला, महेश कूरळकर, रितेश बारहाते, अनूराग मानकर , राहूल गोठे, अनूप गावंडे , चित्राताई अवतारे, नलीनी टोपरे आदीची उपस्थिती होती.