अण्णाभाऊ साठे जयनिमित्य निघालेल्या रॅलीने दुमदुमले चांदूर रेल्वे शहर

0
762
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर वसलेली आहे, असा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
     जयंतीनिमित्य शहरातील मिलींद नगर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली क्रांती चौकातून सिनेमा चौक, जुमा मोटार स्टँड मार्गे भ्रमण करीत अमरावती रोडने पुन्हा मिलींद नगरात पोहचून विसर्जित झाली. या रॅलीदरम्यान आम आदमी पार्टीचे नेते तथा माजी नगरसेवक नितीन गवळी, पत्रकार बाळासाहेब सोरगिवकर, नगरसेवक सतपाल वरठे यांसह अनेकांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याला हारार्पण करून विनम्र अभिवादन केले. या रॅलीने चांदूर रेल्वे शहर दुमदुमले होते. यावेळी गजानन गवई, संतोष वानखडे, सतिष वानखडे, क्रिष्णा कलाने, विनोद लोखंडे, बाळासाहेब सोरगिवकर, गोलू तायडे, मंगेश वानखडे, मंगेश स्वर्गे, नंदू सोरगिवकर, अक्षय गवई, सचिन गवई, रामदास वानखडे, लहानू कलाने, रवि वानखडे, विनोद वानखडे, भारत लोखंडे यांसह अनेकांची उपस्थिती होती.