संत्रा गळती वर चांदुर बाजार येथे मार्गदर्शन

0
1013
Google search engine
Google search engine

संत्रा पिकाची फळगळ थांबविण्यासाठी, शेतकर्याच्या सामुहीक प्रयत्नाची गरज.

  N.R.C.चेसंचालक शास्त्रज्ञ डॉ. लदानिया यांचे,संत्रा पीक फळगळ मार्गदर्शन कार्यशाळेतील प्रतिपादन.

   चांदूर बाजार / कृषी वार्ता प्रतिनिधी=

संत्रा पिक हे अमरावती जिल्हयातिल शेतकर्यांचे,मुख्य कँश क्राँप आहे.या पिकांतील फळगळ ही,शेतकर्याची सर्वात मोठी समस्या आहे.मुख्यत्वे करून ही फळगळ,वनस्पती शास्त्रीय द्रुष्टया,बुरशी जन्य रोग या तिन कारणांमुळे होते.संत्रा पिकांत शास्त्रीय पध्दतीने योग्य ते उपाय करून ही फळगळ कमी केल्या जाऊ शकते.त्यासाठी शेतकर्यानी सामुहीक प्रयत्न करने गरजेचे आहे.असे प्रतिपादन नागपूर येथील,राष्ट्रीय लिंबूवर्गिय फळ संशोधन केंद्राचे संचालक शास्त्रज्ञ, डॉ. एम.एस.लहानिया यांनी केले.           ***यावेळी ते संत्रापिक फळगळ मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.या कार्यचे आयोजन तालुका क्रुषी कार्यालय कडून करण्यात आले होते.या कार्यशाळेत N.R.C.च्या,डॉ. ए.के.श्रीवास्तव, डॉ. एच.डी.हुचे,डॉ. पी.एफ.शिरगुरे या शास्त्रज्ञांसह,विषयतज्ञ व्ही.व्ही.पत्तिवार,बी.व्ही.महल्ले,तंत्रज्ञ व्ही.यु.भोसे,विजय ढेंगरे ईत्यादी नी विषयानुरूप मार्गदर्शन केले.कार्यशाळेला विभागिय क्रुषी अधिकारी सातपेते व ता.क्रुषी अधिकारी शितल ऊके हे ऊपस्थित होते.                                          ***कार्यशाळेत उपस्थित शेतकर्यांना फळगळीवर उपाय सुचवितांना डॉ. लहानिया म्हणाले की,मुख्यत्वे करून संत्रा मध्ये जुलै शेवट व आँगस्ट या महिण्यात व सप्टेंबर -आँक्टोबर मध्ये फळांचा रंग पिवळसर होतांना मोठ्या प्रमाणात फळगळ होते.परीणामी संत्राउत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.तेव्हा सध्या सुरू असलेल्या फळगळीवर लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करणे आवश्यक आहे.त्यासाठी आधी सांगितलेल्या तिन कारणांवर उपाय करणे गरजेचे आहे.संत्रा झाडावर क्षमते पेक्षा जास्त फळे असल्यास फळे गळतात. त्यासाठी खताची योग्य मात्र द्दयावी.एका झाडास,नत्र600ग्राम,स्फुरद-200ग्राम,पालाश200ग्राम देणे आवश्यक आहे. ही मात्रा एकाच वेळी न देता,ती समान तीन ते चार हप्त्यात द्दयावी. त्यामुळे झाडांची फळ टिकवून ठेवण्याची क्षमता वाढेल.तसेच सध्या पावसाच्या ताणामुळे जमिनिचे तापमान वाढल्याने ही फळे गळत आहेत.त्यासाठी संत्रा पिकाला हलके पाणी द्दयावे.बुरशीजन्य व नैसर्गिक फळगळी साठी,जिब्रेलिक अँसिड+1टक्का युरीया+कार्बेणडायझिन बुरशिनाशक,यांची क्रुषी विभागाच्या सल्ल्यानुसार तातडीने फवारणी करावी.फवारणी साठी नामवंत कंपनीच्या च निविष्ठा वापराव्यात.                                       ***त्याच प्रमाणे आक्टोबर मध्ये होणारी फळगळ ही नेमकी फळतोडणीच्या काळातच होते.त्यामागचे कारण म्हणजे फळमाशी होय.फळामध्ये पिवळा रंग येत असतांना ही माशी,फळांना डंख मारून छिद्र करते.त्यामुळेही संत्राफळांची मोठी गळ होते. ही फळगळ थांबविण्यासाठी, बगिच्यात धुर करणे व गंध सापळे लावणे हे चांगले उपाय आहेत.त्यासाठी संत्रापिकात थोडा ओलसर पालापाचोळा जाळून ,रात्रीच्यावेळी धूर करावा.तसेच फळमाशी व रसशोषक किडी साठी गंध सापळे लावावेत.हे सापळे तयार करतांना, एका पसरट भांड्यात 900एम.एल.पाण्यात 10एम.एल.मिथैनाँल+100ग्रँम गुळ+100 ग्राम संत्राफळाचा रस +10एम.एल.निंबोळी अर्क असे मिश्रण करावे.या मिश्रणाचे सापळे 25झाडाच्या मागे एक याप्रमाणे लावावे. दुसर्या सापळ्या साठी बिसलरी बाँटलचा वापर करता येइल.त्यासाठी बाँटल खालुन कापूण घ्यावी.त्यानंतर बाँटलला प्लॅस्टिक पारदर्शक पिशवी घट्ट बांधावी. बाटलीचा गळ्याखालील भाग,1ईच रूंद व2ईंच लांब झडपी सारखा कापूण एका बाजूने उघडा ठेवावा.तसेच झाकणाला छिद्र पाडूण लांब दोर्याने आतल्या बाजूस प्लायवूड चा छोटा ठोकळा बांधावा.या ठोकळ्यावर अमिशा साठी,प्रयोगशाळेतील मिथाईलयुनिनाँल+न्युवाँन प्रत्येकी 5ते6 थेंब टाकून बाटली झाकण बंद करावी.असा तयार झालेले सापळे 5 झाडामागे एक याप्रमाणे लावावेत. ***या सर्व उपायांव्दारे निसर्ग अनुकूल असला तर ,निश्चितपणे संत्राफळ कमी करता येईल.ही कार्यशाळा पं. समितिच्या क्रुषी भवनात घेण्यात आली.कार्यशाळे आधी सर्वच शास्त्रज्ञांनी ,तालुक्यातील जसापूर,नानोरी,शिरजगांव कसबा,शिरजगांव अर्डक,फुबगाव येथिल संत्राबागांची प्रत्यक्ष पाहणी केली.या कार्यशाळेला शेतकर्याची लक्षनिय ऊपसथिती होती.या कार्यशाळेच्या यशस्विते साठी, मंडळ क्रुषी अधिकारी व क्रुषी सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.  .