मुंबईत झाला अज्ञात हल्लेखोराकडून भंगार व्यापाऱ्यावर गोळीबार.

0
932

मुंबईतील मरोळ भागात एका भंगार व्यापाऱ्यावर एका मास्क घातलेल्या माणसाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. असलम वली खान असे या स्क्रॅप डिलरचे नाव आहे. हा डिलर एम. एच. ०२,सी. डब्ल्यू ९९९६ या क्रमांकाच्या आपल्या मर्सिडिजने घरी पोहचला. तो इमारतीच्या बाहेर उभा असतानाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मास्क घातलेल्या हल्लेखोराने असलम वली खानच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. ज्यापैकी एक त्याच्या पोटात लागली तर दुसरी मिस फायर झाली.
त्यानंतर हा शूटर त्याच्या बाईकवर उभ्या असलेल्या साथीदारासह पळून गेला. गोळीबाराचा आवाज आल्याने लोकांनी असलम वली खान यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांना होली स्पिरिट रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. आता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे असलम वली खान यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर कोण होता याचा शोध घेत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींकडूनही या संदर्भातली माहिती घेण्यात येत आहे. असलम वली खान यांच्यावर गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असलम वली खान यांना पोटात लागलेली गोळी काढण्यात आली आहे असे होली स्पिरीट रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.