९ ऑगष्ट क्रांती दिनाला नाशिकला पत्रकारांचे एकदिवसीय धरणे आंदोलन.

0
847
Google search engine
Google search engine

नाशिक :-

पत्रकारांच्या मूलभूत हक्क अधिकारांसाठी येत्या ९ ऑगष्ट २०१८ रोजी ऑगष्ट क्रांती दिनाला सकाळी ११ ते ३ दरम्यान नाशिकच्या.छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पत्रकारांचे राज्यस्तरीय एकदिवसीय धरणे आंदोलन होणार आहे.

पत्रकार संरक्षण समिती.महाराष्ट्र यांच्या संयोजनातून पत्रकार हक्क अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात सातत्याने पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींच्या ज्वलंत मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले जाणारं आहे.रखडलेला पत्रकार संरक्षण मसुदा,पत्रकारांची शासकीय दप्तरी नोंद व्हावी,जाचक अटींमुळे अधिस्वीकृतीपासून उपेक्षा,पत्रकारांच्या पेन्शन योजनेत केलेली विषमता,सरसकट सर्व पत्रकारांचा खालावलेली आर्थिक कौटुंबिक स्थिती बघता शासकीय सर्वे करावा, त्यांच्या कौटुंबिक आरोग्यसेवा व पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन नाशिकला केले जाणार आहे,या आंदोलनासाठी जिल्ह्यातील व राज्यातील अनेक पत्रकार सहभागी होणार आहे,मोठ्या संख्येने पत्रकार बंधुभागिनींनो सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,राज्यउपाध्यक्ष राम खुर्दळ,विभागीय अध्यक्ष भाई सोनार यांनी केले आहे.