दर्यापुर शहरातील प्रमुख मार्गांवर मोकाट जनावरांसहित डुकरे, कुत्र्यांचा  सुळसुळात- नगर परिषद प्रशासनाचा दुर्लक्षपणा >< ताबडतोब बंदोबस्त करावा....प्रहारची मागणी

0
745
Google search engine
Google search engine

प्रहारच्या…. दर्यापुर नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या इशारा

विशेष प्रतिनिधी / दर्यापुर

शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर मोकाट जनावरे व डुकरे, कुत्रांचा सुळसुळात झाला असून जनावरे मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसली असतात त्यामूळे वाहतूक धारकांना वाहतूकीस फार अडचणी येत असून शहर परिसरात अपघातांचे प्रमाणात वाढ झाली असून नगर परिषद प्रशासनाकडून याबाबतीत दुर्लक्ष केल्या जात आहे.नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावरे , डूकरे व अन्य प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या,प्रहारचे विधानसभा प्रमुख प्रदिप चौधरी यांनी केली आहे. शहरातुन अंजनगाव , अकोट, मुर्तीजापूर , अमरावती , आसेगाव शहरांनकडे जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग वर्दळीचा आहे. यामार्गाने सतत वाहनांची रहदारी फार जास्त प्रमाणात

आहे. शहरातील बसडेपो, गांधी चौक बनोसा, या चौकातून विद्यार्थीसह अन्य वाहणधारक याच मार्गांचा वापर करतात मात्र मोकाट जनवारे चौकात व मुख्य रस्त्यावर बसले असल्याने वाहणधारकांना वाहन चालविण्याकरीता जिव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो .शहरवाशीयांना व वाहनधारकांना भेडसावनार्या समस्याबाबत नगर परिषद प्रशासनाने जनावरांना कोंडवाळ्यात कोंडून सहकार्य करावे अन्यथा प्रहारच्या वतीने आपल्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रहारच्या वतीने प्रदिप चौधरी यांनी दिला आहे यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री प्रदिप वडतकर , श्री महेश कुरळकर , डॉ श्री दिनेश म्हाला बाप्पुसाहेब साबळे, सुधीर पवित्रकार , मंगेश साबळे, रितेन बारहाते, अनूप गावंडे, श्री आशिष उमाळे, अमित धांडे, पप्पू पाटील गावंडे ,रामकृष्ण टाले, रितेश बारहाथे,अनूराधाताई गावंडे ,चित्राताई अवतारे, संदीप टाले, भुषन पाटील, आदींसह कार्यकत्यांची उपस्थिती होती..