जिजामाता विद्यालयातील विद्यार्थिनींनी गिरवले सुरक्षिततेचे धडे

0
722
Google search engine
Google search engine

नाशिक :- उत्तम गिते

शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थिनींची सुरक्षितता म्हणूनच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत शालेय विद्यार्थी परिवहन व सुरक्षा महत्त्वाची असल्याने विशाखा आणि परिवहन समिती अंतर्गत जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनीची सुरक्षा याविषयावर मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरीक्षिक दिपक तनपुरे यांनी सोशल मिडीयाचा वाढता गैरवापर , महिला सुरक्षा व कायदा व्यवस्था आणि शाळेत येताना -जाताना घडणाऱ्या घटनांविषयी विद्यार्थिनींना जागरुक केले .तसेच लासलगाव स्थानक प्रमुख भगवान मुंडे यांनी समुपदेशन करताना वाहतूकीचे गैरप्रकार , विद्यार्थिनींची सुरक्षित ने-आण करणे , वायुप्रदुषण नियंत्रण , वाहन चालवण्याचे परवाने व नियमांची माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर , सचिव संजय पाटील , कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील , सीताराम जगताप , कैलास महाजन, पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी तसेच शिक्षक-शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती गायकर तर आभार बाळासाहेब झाल्टे यांनी केले .