तेजस मराठे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

693

धुळे प्रतिनिधी :

धुळे जिल्ह्यातील अथेलेटिक्स अससोसिएशन व रॉयल फिटनेस क्लब ह्याच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अथेलेटिक्स निवड चाचणी घेण्यात आली या स्पर्धेत जिल्ह्या भरातील खेळाडू यांनी सहभाग घेतला होता.

तेजस मराठे याने 20 वर्ष आतील गटात गोलाफेक या क्रीडाप्रकारात तृतीय क्रमांक पटकावला त्याला ब्रॉंझ मेडल व प्रमाणपत्र मिळाले त्याला अथेलेटिक्स कोच प्रमोद पाटील याचे मार्गदर्शन लाभले त्याच्या यशाबद्दल संभाजी ब्रिगेड चे धुळे महानगर अध्यक्ष विकास मराठे , जिल्हाध्यक्ष हेमंत भडक , खो खो असोसिएशन चे आनंद पवार यांनी त्याचे कौतुक केले.

जाहिरात