लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील एन.सी.सी कॅडेट प्रसाद संजय गांगुर्डे या विद्यार्थ्यांची एन.सी.सी अमरावती येथे दि ७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या थल सैनिक कॅम्पसाठी निवड

0
799
Google search engine
Google search engine

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- उत्तम गिते

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील कॅडेट प्रसाद संजय गांगुर्डे या विद्यार्थ्यांची एन सी सी अमरावती येथे दि.७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली. सदर कॅम्पसाठी मुंबई पुणे , अमरावती ‘ कोल्हापूर , व नागपूर अशा पाच विभागातून विद्यार्थी निवड होऊन येणार आहे.सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागातर्फे घेण्यात आलेल्या सर्व वार्षीक प्रशिक्षण शिबीरातून ज्युनिअर विभागातून रायफल शुटींग मध्ये प्रसाद गांगुर्डे याची निवड झाली आहे आता पर्यंत दहा दिवसांचे पाच कॅम्प मधून जिल्ह्यातून सर्व शाळांमधील विदयार्थ्यातून निवड झाली.
सदर निवडी बद्दल सात महाराष्ट्र बटालीयनचे कमांडीग ऑफीसर कर्नल उपेंद्र कुशवाह ,अॅडमिनिस्ट्रेट ऑफीसर कर्नल सतिष शिंदे , सुबेदार मेजर यांच्या हस्ते प्रसाद गांगुर्डे व त्याचे पालक श्री.श्रीहरी शिंदे आणि विदयालयाचे एनसीसी विभाग प्रमुख फर्स्ट ऑफीसर प्रमोद पवार यांचा आज त्रंबक विदया मंदिर येथे सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी श्री महावीर विद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख श्री राजेंद्र बनसोडे,बटालियनचे सर्व पदाधिकारी ,कर्मचारी श्री सुर्यवंशी. धात्रक . भोज , व्यास उपस्थित होते.सदर निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील ,शंतनू पाटील,कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,प्राचार्या अनिता अहिरे,सुधाकर सोनवणे,जिजामाता कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्री.बाबासाहेब गोसावी व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.