मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन?हे तर विभागीय आयुक्तांचे पत्र;परळीतील आंदोलन सुरूच राहाणार-आबासाहेब पाटील

0
685
Google search engine
Google search engine

परळी :- प्रतिनिधी

लेखी आश्वासन परंतू मुख्यमंत्र्यांचे नव्हे तर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भपकर यांचे पत्र आंदोलनकर्त्यांना जिल्हा प्रशासनाने वाचून दाखिवले मात्र, हे लेखी आश्वासन परिपूर्ण नसून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने आबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेण्याची भूमिका सुरवातीपासून येथील मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. यामध्ये मेगा भरतीला स्थगिती, आंदोलन दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच आरक्षणाबाबतचा निर्णय लेखी स्वरूपात देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांचे पत्र आंदोलकांना मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐन वेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकार यांचे पत्र जिल्हाअधिकारी एम.डी.सिंह व उपजिल्हाअधिकारी महेंद्र कांबळे यांनी वाचून दाखविले होते. यावेळी पोलीस अधिक्षक जी श्रीधर व प्रषानातील अधिकारी उपस्थित होते. मात्र, विभागीय आयुक्तांच्या पत्रव्यवहारावर निर्णय होणार नाही तर सर्वच्या सर्व मागण्यांची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी द्यावी आणि तरच आंदोलन मागे घेतले जाईल अन्यथा ९ आॅगस्टपासून होणारे आंदोलन अधिकच तीव्र केले जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आज २० व्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले आहे. उद्या मुख्यमंत्र्याचे पत्र मिळते का? त्यावुरनच ९ आॅगस्टच्या आंदोलनाची भूमिका ठरणार आहे.