आकोटातील आगामी कावड उत्सवानिमित्य पोलिस प्रशासन व पालखी पदाधिकाऱ्यांची बैठक

0
833
Google search engine
Google search engine

आकोटः(संतोष विणके)-अकोला शहरानंतर अकोट शहरात कावड उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शहरातील 22 कावड मंडळ या उत्सवात हजारो शिवभक्तांसह सहभागी होतात. ह्या वर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दिनांक 3 अॉक्टो.ला अकोट शहरात कावड उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.यासाठी शिवभक्त रविवारी रात्रीच गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पाणी आणून सोमवारी सकाळी वाजत गाजत शहरातून कावड मिरवणूक काढून तपेश्वर मंदिरातील शिवलिंगा ला जलाभिषेक करतील. या उत्सवात हजारो लोकांसह शिवभक्त व कावडधारी मंडळं सहभागी होतील.यावेळी अकोट शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघुन जागोजागी कावडीची पूजा व शिवभक्तांना प्रसादाचे वाटप होतें .ह्या दरम्यान कायदा व सुवयवस्था कायम राहावी म्हणून कावड मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सावली सभागृहात बैठक बोलाविली होती.

बैठकीला नगर पालिका अध्यक्ष हरिणारायन माकोडे, कावड मंडळाचे अध्यक्ष संजय गोरे, दिगंबर सोळंके, अनंता मिसाळ व ईतर पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने हजर होते.सदर बैठकीत मध्ये कावड उत्सव शांततेत साजरा होण्या साठी आवश्यक बाबीवर चर्चा झाली.