त्या १४ आरोपींना ८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी – मराठा आंदोलनादरम्यान दुध डेअरी तोडफोड प्रकरण २५ आरोपी फरार

0
751
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       शनिवारी चांदूर रेल्वे शहरात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान दुध डेअरीची तोडफोड करणाऱ्यांमधील अटक १४ आरोपींना पोलीसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
       मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे शनिवारी संपुर्ण चांदूर रेल्वे शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या बंद दरम्यान काही युवकांनी शहरातील गाडगेबाबा मार्केट मधील सैय्यद आसिफ सैय्यद सादीक यांच्या मालकीचे रघुविर दुध डेअरीचे शटर वर करून दुकानातील दुधाची कॅन, काऊंटर व सै. आसिफ यांचे महिन्द्रा अल्फा प्लस थ्री व्हीलरचे समोरील काच फोडण्यात आले होते. तसेच आजुबाजुला दगडफेक करून दहशत निर्माण केली. याची तक्रार सै. असिफ यांनि चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला देऊन  अंदाजे २० ते २५ हजारांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. यानंतर पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. डेअरी जवळ दुसऱ्या व्यावसायीकाचा असलेला सि. सि. टी. व्ही. कॅमेरामध्ये सदर बाब कैद झाल्यामुळे पोलीसांनी ते सि. सि. टी. व्ही. फुटेज तपासले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसांनी ३९ आंदोलनकर्त्यांविरूध्द गुन्हा नोंदविला. यापैकी पंकज रमेशराव माने, रितेश प्रमोद गुजर, रोहीत चंदुलाल बाबर, गोलु उर्फ सागर गजानन यादव, संदिप दामोधर जरे, सोनु उर्फ निलेश चंदु गायकवाड, पवन महादेवराव यादव, आकाश बंडु यादव, स्वप्निल श्रीधर जरे, निखील विनोद पवार, निखील गजानन यादव, निशीकांत प्रमोदराव गुजर, सुरज दिपकराव इंगळे व आयोजक किशोर श्रीधरराव यादव अशा १४ आरोपींना रविवारी चांदूर रेल्वे पोलीसांनी अटक केली होती. अटक आरोपींना सोमवारी चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता १४ ही आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील २५ आरोपी अजुनही फरार असुन पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लसंते, एएसआय मोतीराम पवार व इतर सहकारी करीत आहे. आरोपींतर्फे अॅड. प्रशांत भेलांडे यांनी तर सरकारी पक्षातर्फे अॅड. जुनघरे यांनी बाजु मांडली. यावेळी न्यायालय परीसरात शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती.