खरिपाचे पिक जोमात असतानाच पावसाची दांडी शेतकरी चिंतेत

0
838

नाशिक प्रतिनिधी/ उत्तम गिते

खरिपाचे पिक ऐन जोमात असतानाच पुन्हा पावसाने मोठी दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल पिक वाया जात असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झालेले आहे.गेल्या महिन्यापासून पाऊसाचा थेंब पडला नाही.सोयबीनसह इतर पिकांनी माना टाकल्याचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बँके कडून तसेच हात उसणे पैसे उचलून पेरणी केली. आता पिकांनी माना टाकल्यामुळे आलेले पिक उपटून टाकायची वेळ आली आहे. पाऊस नाही पडलातर पुढील रब्बी हंगामातील पेरणी देखील शेतकऱ्यांना करणे अवघड आहे. अशीच परिस्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

शासन ही शेतकऱ्यांसाठी ठोक निर्णय घेत नसल्यामुळें शेतकरी व्दिविधा मनस्थती मध्ये पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील व आजुबाजुच्या परिसरात येत्या चार ते पाच दिवसात जर पाऊस नाही आला तर हातची आलेली पीके वाया गेल्या शिवाय राहणार नाही. परिसरात सध्यातर दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.जुनच्या पहिल्या आठवड्यात खरीपाची पेरणीला सुरुवात करण्यात आली. पेरणीसाठी चार ते पाच हजार रुपये खत आणि बियाणे पाच ते सहा हजार रुपये, खुरपणी कोळपणी दहा हजार रुपये एकरी खर्च करण्यात आला. तरी पाऊस उगाडल्यामुळे आलेल पिक देखील हाततून जाण्याची शक्यता. आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांनी सुरुवातीलाच मोठ्या कष्टाने बँका व हात उसने पैशाची तरतूद करून पेरणी केली.आता पाऊस जर नाही पडला तर शेतकरी आर्थिक संकटात सापडून येणार आहे.