धुळे जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशन व रॉयल फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय अथेलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा संपन्न

774

धुळे प्रतिनिधी : विकास मराठे

धुळे जिल्हा अथेलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा दि. 04 ऑगस्ट 2018 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे पडली, सदर स्पर्धेत 14 वर्ष , 16 वर्षे , 18 वर्ष , 20 वर्षे आतील मुले व मुली ह्या वयोगटात संपूर्ण जिल्हाभरातून 700 ते 800 खेळाडू नि सहभाग घेतला होता निवड झालेल्या खेळाडू ची राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून सदर स्पर्धा दि 23 व 24 ऑगस्ट डेरवण येथे 14 ते 16 वर्ष वयोगट व 18 व 20 वर्षे वयोगट 29 व 30 ऑगस्ट मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार श्री बाबासो राजवर्धनजी कदमबांडे ह्याच्या हस्ते करण्यात आले ह्यावेळी अथेलेटिक्स असोसिएशन चे सचिव मा. नरेंद्र पाटील ,कोषादयक्ष मा. हेमंत भदाणे ,क्रीडा मार्गदर्शक गणेश थोरात,कुस्ती मार्गदर्शक जगदीश चौधरी,रॉयल फिटनेस क्लब चे संचालक अध्यक्ष प्रमोद पाटील,संभाजी ब्रिगेड धुळे शहर अध्यक्ष विकास मराठे व आदी मोठया संख्येने उपस्थित होते
सदर स्पर्धेत यशस्वी खेळाडू ना प्रथम , द्वितीय ,तृतीय सर्व खेळाडू ना अनुक्रमे गोल्ड , सिल्वर , ब्रॉंझ मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले हे धुळे महानगरपालिका च्या महापौर श्री कल्पना काकु महाले ह्यांच्या हस्ते देन्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रॉयल फिटनेस क्लब चे संचालक प्रमोद पाटील,गोमाजी थोरात,गणपत पावरा,निलेश सोनावणे आशिष गुरव,मयूर ठाकरे ह्यांनी प्रयत्न केले स्पर्धेचे सूत्रसंचालन जि.एन.देवरे व विकास मराठे यांनी केले.

जाहिरात